Coronavirus : राज्याची ‘चिंता’ वाढली ! ‘लक्षणं’ नाहीत तरीही व्यक्ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

सांगली : पोलीसनामा ऑलनाइन – राज्यात कोरना बाधितांची संख्या दिवसेंदविस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाय योजना केल्या जात आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली असताना दुसरीकडे सरकारची चिंता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण सांगली जिल्ह्यात एक व्यक्तीला कोरनाची लागण झाली आहे. परंतु या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत.

मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजीचे निधन झाल्याने गेला  होता. त्या ठिकाणी त्याचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याची माहिती साताऱ्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना कळवली. या नंतर सर्वत्र खळबळ उडाली.

कर्नाळ येथील व्यक्तीला शनिवारी (दि.2) मिरज सिव्हील येथील आयोसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीला कोरनाची कोणतीही लक्षणं नव्हती. तरी या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीच्या संपर्का आलेल्या व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला आहे. यासाठी वैद्यकीय पथक गावात दाखल झाले आहे.