Coronavirus Effect in World : सौदी अरेबियाने केली हज यात्रा तात्पुरती ‘स्थगित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सौदी अरेबियाने मुस्लिमांना हज यात्रेची तयारी तात्पुरती स्थगित करण्यात सांगितले आहे. सौदी अरेबियाचे हज मंत्री मोहम्मद बेन्टेन यांनी मुस्लिमांना सांगितले की, आजकाल कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, म्हणून हज यात्रेसाठी तयारी करू नका. जर गोष्टी सामान्य असत्या तर या महिन्यात मुस्लिमांना सौदी अरेबियामध्ये उमरासाठी पाठवले गेले असते. पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र डॉननेही अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. हज मंत्री मोहम्मद बेन्टेन यांनी याबाबत अल इखबरिया टेलिव्हिजन वाहिनीला सविस्तर माहितीही दिली आहे.

ते म्हणाले की, सौदी अरेबिया हज यात्रेकरूंसाठी पूर्णपणे तयार आहे, परंतु महामारी लक्षात घेता हे तात्पुरते स्थगित केले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अरब राज्यातील लोक तसेच इतर देशांतून येणाऱ्या लोकांच्या आरोग्याबद्दल पुर्णपणे चिंतेत आहे, इथे पोहचल्यानंतर कोणीही आजारी पडावे अशी त्यांची इच्छा नाही. प्रत्येकाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे आहे त्यामुळे हे स्थगित केले जात आहे. जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा यात्रा उघडली जाईल.

ते म्हणाले की, कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण जग त्रस्त आहे, अशा परिस्थितीत अरब कोणत्याही नागरिकाचे आयुष्य धोक्यात आणू शकत नाही. हे लक्षात घेऊन ते स्थगित गेले आहे. परिस्थिती सामान्य होताच हज यात्रेस प्रारंभ होईल आणि सर्वांचे स्वागत केले जाईल. हज करणाऱ्यांना सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारेही याबद्दल माहिती मिळेल. त्यांनी थोडासा धीर धरला पाहिजे.

तथापि, सौदी अधिकाऱ्यांनी अद्याप यावर्षी ते हजसोबत जाणार की नाही याची घोषणा केलेली नाही. गेल्या वर्षी अडीच लाख लोक हज करण्यासाठी सौदी अरेबियात पोहचले होते. असेही म्हटले जाते की, सौदी अरेबियासाठी हज यात्रा मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. जगभरातील लोक सौदी अरेबियात हज यात्रा करण्यासाठी जातात आणि त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो.

आता सरकारचे म्हणणे आहे की, या दिवसात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला आहे, म्हणून खबरदारी म्हणून लोकांना एका ठिकाणी गोळा होऊ द्यायचे नाही. परिस्थिती सामान्य असेल तेव्हा हज यात्रा सुरू केली जाईल. सौदी अरेबियामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 1,563 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत, संसर्गातून 10 मृत्यूची नोंद देखील झाली आहे.