Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसची भीती अशी पसरली की भारतामध्ये बुडाले 13 लाख कोटी रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहानपासून सुरु झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप आता पूर्ण जगात पसरला आहे. हा विषाणू आता भारतात देखील आला आहे. या विषाणूमुळे भारतातील लोकांचे जवळपास १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे झाले ते जाणून घेऊया.

जागतिक स्तरावर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार घाबरले आहेत.

याच कारणामुळे परदेशी सह देशांतर्गत गुंतवणूकदार देखील शेअर्सची विक्री करीत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजार निर्देशांक बीएसई इंडेक्स चे बाजार भांडवलही जवळपास १३ लाख कोटींनी कमी झाले आहे.

गेल्या ११ फेब्रुवारीला शेअर बाजारामध्ये निर्देशांकाची मार्केट कॅप १,५८,९७,५०५.२६ कोटी रुपये होती, ती बुधवारी म्हणजेच ४ मार्च रोजी १,४६,८३,५९७.९३ कोटी रुपयांवर आली.

याचा अर्थ असा की ११ फेब्रुवारीनंतर गुंतवणूकदारांना आतापर्यंत १२.८२ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. भारतात कोरोना विषाणूच्या २८ हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे.

याच कारणामुळे गुंतवणूकदारांची भीती वाढली आहे. तथापि जागतिक स्तरावर या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हेच कारण आहे की अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दरात अर्ध्या टक्क्यांनी कपात केली आहे. त्याचवेळी चीनच्या मध्यवर्ती बँकेनेही व्याज दरात कपात केली.