Coronavirus Vaccine : ‘ही’ 22 वर्षीय वैज्ञानिक स्वतःच्या मृत्यूचा धोका घेण्यास तयार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 22 वर्षीय शास्त्रज्ञाने म्हटले की, कोरोना विषाणूच्या लसच्या संशोधनासाठी ती स्वतः कोरोना संक्रमित होण्यास तयार आहे. सोफी रोज नावाच्या मुलीचे म्हणणे आहे कि, कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी ती मृत्यूचा धोका पत्करण्यास तयार आहे. सोफी ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनमधील रहिवासी आहे. तिचे म्हणणे आहे की, ही लस मिळवल्याने लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात, म्हणूनच ती धोका पत्करण्यास तयार आहेत. सोफीने कोरोना लसीच्या संशोधनास गती देण्यासाठी 1DaySooner नावाची मोहीम सुरू केली आहे आणि ही लस लवकर तयार करण्यासाठी मानवी आव्हानांची चाचणी सुरू करण्याचे विविध देशांना आवाहन करीत आहे. मानवी आव्हानाच्या चाचणी दरम्यान लसीकरण केलेल्या स्वयंसेवकाना हेतूपूर्वक संक्रमित केले जाते.

स्टेनफोर्ड विद्यापीठाची पदवीधर सोफीचे म्हणणे आहे की, जर उपचार शोधण्याची शक्यता असल्यास ती तिचे शरीर देण्यास तयार आहे. ती म्हणाली की, एक दिवस ती आपल्या जवळच्या मैत्रिणीला किडनी दान करण्याचा विचार करत होती, परंतु नंतर असा विचार केला की, तिने कोरोनाच्या मानवी आव्हानाच्या चाचणीत भाग घेतला तर कोट्यावधी लोकांना फायदा होईल.

सोफी म्हणाली की, जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. आर्थिक नासाडी होत आहे आणि कोट्यवधी लोक मरत आहेत, आजारी पडत आहेत. जर लसीची चाचणी केवळ तरुणांसाठी प्रभावी ठरेल तर ती फायदेशीर ठरेल. तरूण आरामात कामावर जाऊ शकतील आणि अर्थव्यवस्था सुधारेल. दरम्यान, सोफी ऑक्सफोर्ड विद्यापीठात क्लिनिकल कॅन्सर संशोधक म्हणून काम करत होती. पण मे महिन्यात 1DaySooner मोहीम सुरू करण्यापूर्वी तिने संशोधक म्हणून नोकरी सोडली. आतापर्यंत 151 देशांमधील 33 हजार स्वयंसेवकांनी 1DaySooner मोहिमेद्वारे मानवी चाचणीत भाग घेण्यासाठी आपली नावे दिली आहेत.