तुमच्यावर करा कोरोनाच्या औषधाची ‘टेस्ट’, घेऊन जा ‘इतके’ लाख रूपये

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन  – लंडनच्या व्हाइटचॅपल येथील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसची लस बनवण्यासाठी 24 लोकांना बोलावले आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, जे या प्रयोगात सहभगी होऊन आपल्यावर लशीची टेस करून घेतील त्यांना 3500 पाउंड म्हणजे 3,33,620 रुपये दिले जातील. परंतु, यासाठी तुम्हाला अगोदर कोरोना व्हायरसचा संसर्ग करून घ्यावा लागेल.

डेली मेल वृत्तपत्रानुसार लंडनच्या व्हाइटचॅपल येथील द क्विन मेरी बायोएंटरप्रायजेस इनोव्हेशन सेंटरचे वैज्ञानिक आपल्या प्रयोगासाठी 24 लोकांना भरती करत आहेत.

या 24 लोकांवर कोरोना व्हायरसच्या लशीचे परिक्षण करण्यात येणार आहे. ज्या लशीचे परिक्षण या 24 रूग्णांवर करण्यात येणार आहे, त्या औषधात सार्स आजाराचे औषधही मिसळले आहे.

परंतु, विशेष गोष्ट म्हणजे या परिक्षणात सहभागी झाल्यानंतर लगेचच तुमच्या शरीरात कोरोना व्हायरसचा कमजोर स्ट्रेन टाकला जाईल. यानंतर त्याच्या वाढण्याची वाट पाहिली जाईल. नंतर लस दिली जाईल.

या परिक्षणादरम्यान एचव्हीवो कंपनीने तयार केलेल्या औषधाचा प्रयोग केला जाईल.

या दोन आठवड्यात वैज्ञानिक हे पाहतील की, या 24 लोकांवर औषधाचा परिणाम कसा होत आहे? ते कोरोना व्हायरसवर परिणाम करत आहे किंवा नाही.

युरोपियन देशातील 35 कंपन्या कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. युनायटेड किंगडम सरकारने तर कोरोना व्हायरसचे औषध शोधणासाठी 440 करोड उपलब्ध केले आहेत.

आतापर्यंत संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे एकुण 117,747 लोकांना संसर्ग झाला आहे. यामुळे संपूर्ण जगात 4292 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये 80,778 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 3158 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इटली दूसरा सर्वात प्रभावित देश आहे. येथे 10,149 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 631 लोकांचा मृत्यू झाला आहे.