कोरोनाशी लढा : आज मिळणार 2-डीजी औषधाचा 10 हजार पाऊचवाला दुसरा साठा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोविड-19 साठी वापरले जाणारे औषध 2-डीजीचा दुसरा साठा गुरुवारी जारी केला जाईल. 10 हजार सॅशेचा दुसरा साठा डॉ. रेड्डीज लॅब जारी करणार आहे. हे औषध हैद्राबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) सोबत मिळून डीआरडीओचे इन्स्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (आयएनएमएएस) ने तयार केले आहे. औषधाच्या मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला दिली आहे.

हैद्राबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) आणि डीआरडीओने निर्मिती केलेले औषध 2-डीजी कोविड-19 रूग्णांच्या उपचारात अतिशय उपयोगी आहे. हे औषध कोरोना महामारीविरूद्ध जारी लढाईत निर्णायक ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

या औषधाच्या क्लिनिकल टेस्टच्या आकड्यांवरून समजते की, देशाच्या दोन डझनपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत याच्या तिसर्‍या टप्प्याची क्लिनिकल चाचणी जारी राहील. या औषधाच्या चाचणीत 220 रूग्णांचा समावेश केला जाईल.

औषधाची तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल टेस्ट जानेवारीमध्ये सुरू झाली होती. तर दुसर्‍या टप्प्याची चाचणी मागील वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान झाली होती ज्यामध्ये 110 रूग्णांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या औषधाच्या वापर कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी सुद्धा केला जातो.