Coronavirus new symptoms : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ‘ही’ आहेत नवीन लक्षणे, तापामध्ये सुद्धा झाला ‘हा’ फरक

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरू असताना पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या या लाटेत अनेक वेगळी लक्षणे सुद्धा आहेत. यामुळे अनेक लोक यास समजू शकत नाहीत आणि दुर्लक्ष केल्याने स्थिती गंभीर होत आहे. एम्समध्ये पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉक्टर विजय हुड्डा यांनी ट्विटरवर कोरोनाच्या काही नवीन लक्षणांची माहिती दिली आहे, जी ओळखून वेळीच उपचार सुरू करता येऊ शकतात.

कोरोनाची नवीन लक्षणे –
ताप, घसा खराब होणे, सर्दी, शरीर-मांसपेशीमध्ये वेदना, थकवा, चव आणि वास क्षमता नष्ट होणे, थंडीसह ताप, सांधेदुखी या सामान्य लक्षणांशिवाय या दुसर्‍या लाटेत काही नवीन लक्षणे आढळून आली आहेत. काही रूग्णांमध्ये अतिसार, पोटात दुखणे, अंग दुखणे, उलटी येणे, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक सारखी नवीन लक्षणे दिसून आली आहेत.

डॉक्टर विजय हुड्डा काय म्हणाले…
* या लाटेत 10 दिवसांपर्यंत सुद्धा रूग्णांमध्ये ताप राहतो.
* कोरोना कोणत्याही रूपात समोर येऊ शकतो.
* काहीही नवीन आणि विचित्र जाणवले तर त्यास कोरोनाचे लक्षण समजा. डॉक्टरांकडे जा.
* आश्चर्य म्हणजे अनेकदा डोळे लाल होणे (कंजक्टिवायटिस) हे सुद्धा कोरोनाचे लक्षण असू शकते.
* डॉक्टरांनी सर्व लक्षणांना कोरोना लक्षण समजूनच काम केले पाहिजे. रुग्णांना ताबडतोब कोरोना टेस्टचा सल्ला दिला पाहिजे. यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे उपचार सुरू करावेत.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले…
* जर केवळ डोकेदुखी आणि अंगदुखी असेल तरी हे कोविडचे लक्षण असू शकते.
कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
* खुप जास्त थंडी वाजण्यासह ताप येणे याचा अर्थ असू शकतो की, तुम्ही व्हायरसच्या संपर्कात आला आहात. हे लक्षण पूर्वीच्या लाटेत सुद्धा होते.
* तसेच मांसपेशी आणि सांध्यामध्ये वेदना सुद्धा सामान्य लक्षण आहे.