COVID 2nd wave symptoms in kids : दुसर्‍या लाटेत मुलांमध्ये दिसताहेत ‘ही’ 6 लक्षणे, समजून घ्या आणि टेस्ट करा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. दुसर्‍या लाटेत संक्रमित आणि मृतांचा आकडा प्रचंड वाढला आहे. ही दुसरी लाट लहान मुलांसाठी सुद्धा धोकादायक ठरत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी 4 महिन्याच्या वरील वयापर्यंतची मुले संक्रमित होत आहेत.

मुलांमधील या लक्षणांवर ठेवा लक्ष
मात्र, तज्ज्ञ दावा करतात की, अजूनही मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी आहेत, आणि प्रौढांच्या तुलनेत मुले लवकर बरी होतात. दुसर्‍या लाटेत लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. अगोदरपर्यंत केवळ ताप किंवा थकवा मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण मानले जा होते. व्हायरसने आता आणखी लक्षणे पसरवली आहेत आणि सोबत जास्त लक्षणे निर्माण करत आहे.

पोटात दुखणे
कोरेानाच्या दुसर्‍या लाटेत पोटात गडबड म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनलचे लक्षण दिसत आहे. मुलांमध्ये सुद्धा याचा प्रभाव पडत आहे. असामान्य पोटदुखी, सूज, जडपणा, पोटात मुरड हे सर्व संकेत असू शकतात की, मुल कोरोनाच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल लक्षणांनी पीडित आहे. काही मुले भूक लागत नसल्याची तक्रार करतात, खाण्याची इच्छा होत नाही.

अतिसार
अतिसार आणि उलटी सुद्धा लक्षणे आहेत, जी मुलांना सामान्यपणे प्रभावित करतात. कोरोना व्हायरसमुळे पोटात सूज आणि पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या मुलात अशी लक्षणे दिसल्यास चाचणी करा.

मध्यम किंवा जास्त ताप
कोरोनामुळे मुलांमध्ये ताप 102 डिग्री फॅरनहाईट होऊ शकतो. या तापात थंडी, वेदना, कमजोरी जाणवते. मुलांच्या बहुतांश प्रकरणात ताप 2-3 दिवसात जातो. पण, लक्षणे 5 दिवसांपर्यंत राहिली तर सतर्क व्हा.

सतत सर्दी आणि खोकला
सतत खोकला किंवा गंभीर सर्दी मुलांमध्ये वरील श्वसनमार्गातील संसर्गाचा संकेत असू शकतो. जर खोकला अणि सदी कमी होण्यास जास्त वेळ लागत असेल आणि घशात खवखव असेल तर कोरोनाचा संकेत असू शकतो.

थकवा
थकवा, सुस्ती आणि बिघडलेली झोप नेहमी असे संकेत आहेत ज्यावरून समजते की, रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाशी लढण्यात व्यस्त आहे. थकवा आणि सुस्ती लहान मुलांमध्ये संसर्गाचा संकेत असू शकतो.

त्वचेवर चट्टे
पायाच्या बोटावर पुरळ येणे हे लक्षण मागील वर्षी मुलांमध्ये पहिल्यांदा दिसून आले होते. अजूनही मुलांमध्ये हे सामान्य लक्षण आहे. या बाबतीत चट्टे, पित्त तसेच हात आणि पायाची बोटे जांभळसर दिसणे कोरोनाचे लक्षण असू शकते.