Coronavirus : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असून मुंबईत संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू केले जाणार आहे. ही संचारबंदी १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल. तर पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी असेल. तसेच सर्वसामान्यांना केवळ महत्वाच्या कामासाठी फक्त २ किमीपर्यंत बाहेर जाण्यास परवानगी असेल.

लोक घराबाहेर पडत असल्याने मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत चालली आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पोलिस कमिशनर प्रणय अशोक यांनी आदेश दिले आहेत.

ही संचारबंदी पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत लागू असेल. आणि यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांनाच प्रवास करता येईल. तर सर्वसामान्यांना फक्त २ किमीपर्यंत प्रवास करता येईल.