Coronavirus Impact : शेअर बाजारात ‘पडझड’ सुरूच

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायसचा परिणाम अजूनही शेअर बाजाराव टिकून आहे.
भारतात पसरत चाललेल्या कोरोनाच्या भीतीचे सावट शेअर बाजारावर गुरूवारीही दिसून आले आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराला सुरूवात होताच निर्देशांक तब्बल दोन हजार अंकांनी कोसळला. शेअर बाजार 27099.32 अंकावर सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच 2045.75 अंकांनी कोसळला. तर निफ्टी 442 अंकांनी घसरली आहे.

कोरानामुळे जगभरातील देशांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलावरही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. भांडवली बाजारातील मोठी निर्देशांक पडझड कायम आहे. बुधवारी (18 मार्च) सेन्सेक्सनं एकाच सत्रात 1,709.58 अंशांची आपटी नोंदविताना 29 हजाराचा स्तरही सोडला. अखेर मुंबई निर्देशांक 28,869.51 वर स्थिरावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांक व्यवहारात 500 अंश घसरणीमुळे 8,500 च्याही खाली आला होता.

निफ्टी सत्रअखेर 498.25 अंश नुकसानासह 8,468 पर्यंत थांबला होता. गुरूवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच पुन्हा घसरगुंडी उडाली आहे. दिवसेंदिवस शेअर बाजारात घसरण होत असल्यामुळे भांडवलदारांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनामुळे भांडवलदारही हतबल झाले असून त्यांना कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.