Coronavirus : स्पेनमध्ये ‘लॉकडाऊन’ दरम्यान ‘सेक्स पार्टी’, पोलिसांकडून पर्दाफाश, 6 जणांविरोधात FIR

पोलीसनामा ऑनलाईन :जगभरातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापासून वाचण्यासाठी अनेक देशातील लोक सध्या सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. सर्व लोक सोशल डिस्टेंसिंग ठेवत आहेत. काही देशात राष्ट्रव्यापी लॉकडाऊन आहे. असं असतानाही असे काही लोक आहेत जे आपली आणि इतरांची लाईफ धोक्यात घालण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. कोरोनाचा प्रकोप पाहता स्पेनमध्येही लॉकडाऊन आहे. असं असतानाही आता पोलिसांनी अशा एका टोळीचा पर्दाफाश केला आहे जी लॉकडाऊनदरम्यान सेक्स पार्टी करण्यात मग्न होती.

एका इंग्रजी वृत्तानुसार, स्विंगर्स मॅड्रिडच्या एका फ्लॅटमध्ये सेक्स पार्टी सुरू होती. असं सांगितलं की, जातं हा फ्लॅट एक वेश्यालय आहे. या फ्लॅटच्या शेजारी राहणाऱ्यांनी तिथं सुरू असलेलं संगीत आणि, आरडा ओरडा, प्लॅटमध्ये येणाऱ्या लोकांचा आवाज ऐकल्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. पोलीस जेव्हा फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना चार महिला आणि दोन पुरुष नग्न अवस्थेत सापडले. पोलिसांनी या टोळीच पर्दाफाश करत या सेक्स पार्टीत सहभागी सर्व 6 जणांवर गुन्हा दाखल कोला आहे.

यातील 5 लोकांना कॉविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी स्पॅनिश सरकारनं लागू केलेल्या राष्ट्रीय क्वारंटाईनचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.