Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’चा काळ खरंच अजून वाढणार का ? शरद पवार यांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन देशभर जाहीर केला आहे. सध्याची वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा लॉकडाउनचा काळ अधिक वाढवण्यात येईल अशी चर्चा सर्वत्र आहे. याबाबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन संपायला अजून 2 आठवडे आहेत. या काळात लोकांनी जर नीट काळजी घेतली तर कदाचित हा काळ अजून वाढवण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी.’ फेसबुक लाईव्ह द्वारे ते जनतेशी संवाद साधताना बोलत होते.

साखर कारखानदारांना मजुरांची सोय करण्याच्या सूचना

लॉकडाउनच्या घोषणेनंतर राज्यातील उसतोड मजुरांची स्थिती बिकट झाली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपण साखर कारखानदारांना याबाबत सूचना दिली असल्याचं सांगितलं आहे. ‘तुमच्या कारखान्याची तोड पूर्ण झाली असो वा नसो, तुमच्याकडील ऊसतोड मजुरांची सोय तुम्ही करावी, अशा सूचना मी साखर कारखानदारांना दिल्या आहेत,’ असं शरद पवार म्हणाले.

सरकार आणि संस्थांवर मोठी जबाबदारी

आजचं संकट गंभीर…दीर्घकालीन परिणाम करणारं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं हे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. मी कुणालाही भेटलेलोही नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध संस्थांवर मोठी जबाबदारी आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी, असंघटीत कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याबाबत काही मागण्या केल्या होत्या.

दरम्यान, शरद पवार यांनी 27 मार्च रोजीही फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या काही निर्णयांचं स्वागत केलं. मात्र त्याचवेळी काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like