Coronavirus : कोल्हापुरमधील शिवाजी विद्यापीठात एक हजार बेडचं ‘आयसोलेशन’ रूग्णालय होणार ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचे संकट वाढल्यास पूर्ण तयारी असावी, नागरिकांना क्वॉरन्टाईन करता यावे म्हणून अनेक इमारतींचे रुग्णालयात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह देखील आयसोलेशन म्हणून वापरता येतील असा विचार समोर आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे एक हजार बेडची मागणी केली आहे.

शिवाजी विद्यापीठ बंद असून परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशावेळी विद्यापीठातील वसतिगृहांचा वापर आयसोलेशन रुग्णालय म्हणून करता यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठातील कोणत्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारावं यावर चर्चा सुरु आहे.

कोरोना व्हायरसचे संकट अजून किती गडद होते याबद्दल माहिती नाही. मात्र जर संकट वाढलेच तर नागरिकांना सुरक्षित ठेवता येईल यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक हॉटेल्स आणि संस्थांना देखील मदत करण्याचे आवाहन केले आहे. होम क्वॉरन्टाईनची सुविधा नसणार्‍यांसाठी कोल्हापुरातील एका तरुण उद्योजकाने थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुले केले आहे.

’स्वामी, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ उदयसिह शिंदे यांचं हॉटेल कृष्णा इन ताराबाई पार्क परिसरात आहे. थ्री स्टार कॅटेगिरीमधील हे हॉटेल तात्पुरते बंद करुन त्यामधील 28 रुम या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी देण्याचे ठरवले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like