काय सांगता ! होय, ‘कोरोना’च्या रिपोर्टमध्ये ‘गोलमाल’ अन् डॉक्टर ‘मालामाल’

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत १३,९५३,३४२ जणांना या संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर ५९२,७७८ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया या देशांमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा महामारीच्या काळात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी दिवस रात्र रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. पण काही डॉक्टर्स अशा परस्थितीत आपल्या पदवीचा गैरफायदा करत नफा कमावण्यात गुंतले आहेत. बांग्लादेशात असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बांग्लादेशमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना एका डॉक्टरने संसर्गाचा सामना करत असलेल्या लोकांना कमाईचे साधन बनवले आहे. एकीकडे या संकट काळात डॉक्टर्स हे हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरले असताना. त्याने हजारो लोकांना कोरोना संसर्गाचे खोटे अहवाल देऊन गंडा घातल्याने हजारो लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. मोहम्मद शाहेद असे या डॉक्टरचे नाव असून, ढाका येथील रुग्णालय आणि लॅबच्या माध्यमातून त्याने हा काळा धंदा केल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, डॉक्टर शाहेदच्या रुग्णालयात एकूण चाचणीसाठी दहा हजार ५०० अहवाल आले होते. त्यातील केवळ ४२०० अहवालांची चाचणी करण्यात आली. तर सहा हजार अहवालाची चाचणीच करण्यात आली नव्हती. हे सर्व अहवाल चाचणी न करताच निगेटिव्ह म्हणून सोपवण्यात आले. या रिपोर्ट साठी डॉक्टर शाहेदने रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारले होते. दरम्यान, सरकारी लॅबमध्ये जेव्हा या सर्व रुग्णांची चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

सदर प्रकार उघडकीस आल्यावर डॉक्टरने रुग्णालय आणि घरातून पळ काढला आहे. एक इंग्रजी बेवसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सदरील डॉक्टर नऊ दिवस पोलिसांना चकमा देत होता. शेवटी बुरखा परिधान करुन भारतात दाखल होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी सीमाभागात त्याला अटक केली आहे.