Coronavirus : धक्कादायक ! पुण्यात पालिकेच्या रूग्णालयातील रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ अन् खासगीमध्ये ‘निगेव्हिट’, कुटूंबाचा जीव 16 तास टांगणीला, पोलिसानं सांगितलं ‘वास्तव’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक धक्कादायक घटना घडली असून, एका पोलीस अधिकाऱ्याचा पालिका रुग्णालयात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण खासगी रुग्णालयात तो निगेटिव्ह आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या गोंधळात मात्र त्या अधिकाऱ्याचा 16 तास जीव टांगणीला तर लागला होताच. पण कुटुंब देखील पूर्ण तणावाखाली अन भयभीत अवस्थेत होते. तत्पूर्वी त्यांनी ज्या पालिका रुग्णालयात तपासणी केली तेथील परिस्थिती पाहून “आश्चर्य” व्यक्त करत तपासणी करताना कुठलीच काळजी घेतली जात नसल्याचे देखील सांगितले आहे. या घटनेमुळे मात्र शहर पोलीस दलात चांगलीच दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विशेष शाखेत कार्यरत आहेत. या विभागाकडे परराज्यातील  कामगारांना रेल्वेने मूळ गावी पाठविण्याची जबाबदारी होती. त्यानुसार या उपनिरीक्षकासोबतच एकूण 37 जण हे काम करत होते. चार दिवसांपूर्वी विशेष शाखेने सर्वांना येरवडा येथील आणाभाऊ साठे महामंडळ ई लर्निंग स्कुल येथे कोरोना चाचणी करण्यासाठी पाठविले. त्यादिवशी या अधिकाऱ्यांनी चाचणी केली. त्यांना कसलाही त्रास नव्हता. मात्र तरीही त्यांनी चाचणी केली. रिपोर्ट येण्याआधी त्यांना त्रास नसल्याने ते बिनधास्त होते. मात्र धक्कादायकरित्या त्यांचा अहवाल रात्री पॉझिटिव्ह आला. यामुळे अधिकारी पूर्ण घाबरून गेले. त्रास काहीच नसल्याने आणि आपण पॉझिटिव्ह येणार नसल्याची खात्री असल्याने ते ड्युटी करून घरी गेलेले. घरात लहानमूल. त्यानी नेहमी प्रमाणे घरात वावर केला. मात्र रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना धक्काच बसला.

रात्रीची वेळ असल्याने त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. पण कुटुंबीय घाबरून गेले होते. पण या अधिकाऱ्याने धीराने आपल्या फॅमिली डॉक्टर मित्रांना फोनवर संपर्क साधला. तसेच त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी त्रास होत नसेल तर काळजी करू नये असा सल्ला दिला. आणि आजची रात्र एकटेच रहा आपण उद्या खासगी रुग्णालयात टेस्ट करू असे सांगितले. या अधिकाऱ्याने अख्खी रात्र कोरोना पॉझिटिव्ह म्हणून काढली. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका खासगी रुग्णालयात टेस्ट केली. त्याचे रिपोर्ट 4 तासांनी आले. त्यावेळी ते रिपोर्ट निगेटिव्ह आले. यानंतर त्यांनी नी सुटकेचा श्वास सोडला. मात्र त्यांना आणि कुटुंबाला ही 16 तास भयंकर मनस्ताप सहन करावा लागला आहे, असे पोलिसनामाशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले, पालिकेच्या आणाभाऊ साठे महामंडळ ई-लर्निंग स्कुलमध्ये टेस्ट करताना तेथील परिस्थिती पाहिली. ती भयानक आहे. तेथे कसलीच काळजी घेतली जात नाही. एका दिवसात 250 ते 300 रिपोर्ट घेतले जातात. पण त्याचा कशालाच कशाचा ताळमेळ नसतो. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दोन घटना रुग्णालयाच्या

शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना जनता वसाहत आणि कोथरूड भागात एकही रुग्ण नव्हता. पण या दोन्ही ठिकाणी कोरोनाची रुग्ण सापडले. त्याचे कारण देखील रुग्णालय असल्याचे सांगण्यात येते. कारण या दोन्ही ठिकाणचे काही नागरिक रुग्णालयात रुटिंग चेकअप साठी जात असत. त्यांच्यासोबत असणाऱ्या दोघांना तेथून कोरोनाची लागण झाली आणि कोरोनाने या भागात शिरकाव केल्याचा आरोप होत आहे.. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की रुग्णालयात खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झाली आणि एकही रुग्ण नसणाऱ्या कोथरूड भागात पाहिला एक रुग्ण झोपडपट्टी परिसरात सापडला.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार 10 हजाराच्या घरात रुग्ण संख्या गेली आहे. महापालिकेकडून शहरातील विविध भागात (फ्लू सेंटर) पालिका रुग्णालयात विनामूल्य कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र याठिकाणी काळजी घेतली जात नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.

पोलीस दल गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून 24 तास काम करत आहे. आतापर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर निम्याहून अधिक जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

दोन्ही रिपोर्ट पडताळणी केली पाहिजे. ते व्हायरलवर असत. एनआयव्हीचा रिपोर्ट ग्राह्य धरला जातो. त्यातही क्वालिटी ऑफ स्वॅब हेही महत्त्वाच असत. ते कोणत्या कालावधीत घेतले गेले आणि कशा पद्धतीने घेतले गेले हे महत्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही रिपोर्ट पडताळणी करणं गरजेचे आहे.

डॉ. रामचंद्र हंकारे (आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका)