Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं श्री माता वैष्णव देवीची यात्रा बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम जगप्रसिद्ध माता वैष्णव देवीच्या यात्रेवर देखील झाला आहे. यात्रेवर बंधने घालणाऱ्या श्री माता वैष्णव देवीच्या श्राइन कमिटीने सध्या देशभरातील भाविकांना यात्रा न करण्याचे आवाहन केले आहे. समितीने मंगळवारी एक सूचना जारी केली ज्यात भक्तांना व्हायरसचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत यात्रेला न येण्याची विनंती केली आणि यात्रा स्थगित केल्याची सूचना दिली.

सतर्कता म्हणून श्री काशी विश्वनाथ मंदिरच्या गर्भगृहात मंगळवारपासून प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. आता 31 मार्चपर्यंत श्रद्धाळू बाहेरुन देवाचे दर्शन घेऊ शकतात. यासाठी दुपारी गर्भगृहाबाहेर पाइपसारखे पात्र लावण्यात आले आहे ज्याने दूध-जल ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचेल. तर विदेशातून आलेल्यांना प्रवेश प्रवेश पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला आहे.

भगवान बुद्धांचे सारनाथ येथील मूलगंध कुटी बौद्ध पार्क आणि मंदिर बंद करण्यात आले आहे. व्रज विद्या संस्थान स्थित बौद्ध मंदिर सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. तर एएसआयच्या अंतर्गत येणारे कुशीनगर स्मारक 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे.

राजस्थानचे प्रसिद्ध धाम स्थळ मेंहदीपूर बालाजीचे दर्शन सामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. आता तेथे केवळ आरती करण्यात येते. कौरली स्थित जैन मंदिर श्री महावीर जी ट्रस्ट यात्रेची परंपरा औपचारिक पद्धतीने राबवण्याची निर्णय झाला आहे. अजमेरचे ख्वाजा साहब दर्गाह येणाऱ्यांची स्क्रिनिंग केली जात आहे. 337 वर्षांपूर्वीचे श्रीनाथजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. 31 मार्च पर्यंत श्रीजी, प्रियाजी, मदनमोहन मंदिर आणि मंदिर मंडळच्या अधीन येणारे सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. हिमाचल सरकारकडून कौटूंबिक सोहळे देखील रोखण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ देखील पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

लष्करात पीटी परेंड बंद –
प्रयागराजमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगळी जात आहे. लष्करात सकाळी होणारी पीटी परेड बंद करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ब्रिगेडियर एस. भंडारी यांच्या मते कोरोनापासून बचाव म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये कोरोनामुळे सरकाराने जंगल सफारीपासून नॅशनल पार्कपर्यंत सर्व काही 31 मार्चपर्यंत बंद केले आहेत.