धक्कादायक ! भाजपा आमदाराची आजारी पत्नी जमिनीवर तडफडत होती मात्र बेड मिळाला नाही

फिरोजाबाद : वृत्तसंस्था – महाराष्ट्र, दिल्ली या राज्याप्रमाणेच उत्तर प्रदेश देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस येथे रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील फिरोजाबाद जनपद येथील भाजपा आमदार रामगोपाल उर्फ लोधी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्र्यातील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण याठिकाणी बेड न मिळाल्याने त्यांच्या पत्नीला 3. तास जमिनीवरच झोपवांव लागल आहे. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध करून देण्यात आला.

आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी यांना 30 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यासोबत पत्नी संध्या लोधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आमदार रामगोपाळ उर्फ पप्पू लोधी यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना शनिवारी आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज मिळाला. परंतु आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्र्यातील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये 7 मे रोजी दाखल केले होते. याठिकाणी पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार पत्नीला जवळपास 3 तास जमिनीवरच झोपवावे लागले. आमदार लोधीने सांगितले की, एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पत्नीवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. जर आमदाराच्या बायकोला जमिनीवर झोपावे लागत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण, पाणी मिळत नाही. अधिकारी आणि डॉक्टरही काय बोलत नाहीत असा आरोप आमदाराने केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 26 हजार 847 कोरोना रुग्ण आढळले आहेत. लखनौमध्ये सर्वाधिक 2 हजार 179 नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या यूपीत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 45 हजार 736 इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या 24 तासांत 298 इतकी नोंदवली आहे.