Coronavirus : ठाणे जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत ‘वाढ’, दिवसभरात तब्बल 773 नवीन ‘प्रकरणे’ तर 32 लोकांचा ‘मृत्यू’

ठाणे, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यात ठाणे जिल्ह्याबद्दल बघितले तर ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यात आता पर्यंतचा सर्वाधिक आकडा हा बुधवारी दिसून आला होता. मात्र त्यानंतरही ही वाढ सातत्याने सुरूच असून दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढून रुग्णांच्या आकडेवारीने साडेसातशेचा टप्पा पार केला. त्यामुळे या आकडेवारीने कोरोना विषाणूच्या संख्येचा नवीन विक्रम नोंदवला गेला. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 773 प्रकरणे समोर आली तर 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आता 13 हजार 715 वर पोहोचला आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या ही 468 वर पोहोचली आहे.

दरम्यान ठाणे महानगर पालिका हद्दीत कोरोनाची 170 प्रकरणे तर 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा हा 4 हजार 655 वर पोहोचला आहे तर मृत्यू झालेल्यांचा आकडा 145 वर पोहोचला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेत 195 रुग्णांची तर, 6 लोकांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 414 वर पोहोचली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या ही 107 वर पोहोचली आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीबद्दल बघितले तर येथे कोरोनाची 87 प्रकरणे आणि 5 लोकांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा 1 हजार 726 वर पोहोचला असून मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 55 वर पोहोचला आहे. तसेच मीरा भाईंदर मध्ये 145 प्रकरणांसह 6 लोकांच्या मृत्यूने कोरोना बाधितांचा आकडा हा 1 हजार 338 झाला असून मृतांचा आकडा 73 वर पोहोचला आहे.

दरम्यान उल्हासनगरमध्ये 15 रुग्ण समोर आली असून एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे येथे कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 690 झाला असून मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. तसेच अंबरनाथमध्ये 86 रुग्णांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा हा 541 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका हद्दीत 43 रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधितांचा आकडा 395 वर पोहोचला आहे. बदलापूरमध्ये देखील 26 रुग्ण समोर आले असून येथील कोरोना बाधितांचा आकडा 380 वर पोहोचला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 10 रुग्ण समोर आली आहेत. त्यामुळे येथील बाधितांचा आकडा हा 575 वर पोहोचला आहे.