Covid-19 Symptoms : आता नखं आणि कानावर दिसू शकतात ‘कोरोना’ची अनेक लक्षणं, अशी ओळखा

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, सूखा खोकला, थकवा, मांसपेशींमध्ये दुखणे आणि घशात खवखव इत्यादीचा समावेश आहे. परंतु आता कोरोनाची लक्षणे बदलत आहेत आणि आता तुम्हाला अशी लक्षणे दिसू शकतात ज्यांची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. आता असे मानले जात आहे की, आता कोरोनाचे संकेत नखं आणि कानांवरून सुद्धा मिळू शकतात. असे व्हायरस आणि ब्लड ऑक्सीजनमधील लिंकमुळे होऊ शकते.

कोरोना आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल
कोरोना व्हायरसमुळे ब्लड ऑक्सीजन लेव्हलमध्ये गडबड होते, स्तर वर-खाली होतो. कोरोना श्वसन प्रणालीच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे सूजेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसाला थेट दुखापत होते. हा रक्तप्रवाहात ऑक्सीजनला प्रभावित करतो. मात्र, कमी ऑक्सीजन स्तराचा अनुभव सर्व रूग्णांना येत नाही. काहींमध्ये सामान्य लक्षण असतात. पल्स ऑक्सीमीटरच्या मदतीने शरीरात ऑक्सीजनचा स्तर मोजता येतो.

नखं आणि कानाद्वारे कोरोना समजू शकतो?
नखं आणि इयरलोबद्वारे ब्लड ऑक्सीजन लेव्हल समजते. सोबतच संकेत देऊ शकतात की, तुम्ही कोरोना पीडित आहात किंवा नाही. यासाठी पल्स ऑक्सीमीटरने लेव्हल तपासू शकता. हे कान किंवा नखांवर वापरता येते.

कोरोना व्हायरसची इतर लक्षणं
ताप, सूखा खोकला, घशात खवखव, वाहणारे किंवा बंद नाक, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास, थकवा, जठरसंबंधी संसर्ग, वास आणि चव जाणे, इत्यादीचा समावेश आहे.

लक्षणे दिसल्यास काय करावे
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, लक्षणे दिसल्यावर केवळ उपचाराकडे लक्ष द्या. महत्वाची खबरदारी घेतली पाहिजे. सामाजिक अंतर राखा, मास्क घाला आणि सतत संपर्का येणारे पृष्ठभाग सॅनिटाइज करा, कारण हा आजार इतरांनाही संक्रमित करू शकतो.