Coronavirus : सिंगर कनिकाची सलग चौथी ‘कोरोना’ टेस्ट देखील Positive !

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड सिंगर कनिका कपूरची चौथी कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आली आहे. कनिका चौथ्यांदादेखील कोरोना पॉझिटीव असल्याचं समोर आलं आहे. परंतु तिची प्रकृती मात्र सध्या स्थिर आहे. कनिक सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी(दि 27 मार्च 2020 रोजी) लखनऊमध्ये एकही कोरोनाग्रस्त आढळला नाही. 8 दिवसांनंतर एकही कोरोनाग्रस्त केस समोर न आल्यानं डॉक्टर्स आणि सरकारलाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

केजीएमयुचे मीडिया प्रभारी डॉक्टर सुधीर सिंह यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं की, “59 लोकांची तपासणी शुक्रवारी लॅबमध्ये करण्यात आली. या सर्वांचेच रिपोर्ट निगेटीव्ह आले.” असंरही त्यांनी स्पष्ट केलं.

कनिका कपूर गेल्या 9 मार्च 2020 रोजी लंडनहून मुंबईत आली होती. यानंतर दोन दिवसांनी ती लखनऊला गेली होती. इथं तिनं पार्टी अटेंड केली होती. यावेळी ती 266 लोकांच्या संपर्कात आली होती. यांचाही शोध घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील 60 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव आला.