महिलेनं बाळाचं नाव ठेवलं ‘सोनू सूद’, अ‍ॅक्टर म्हणाला – ‘माझा सर्वात मोठा अवॉर्ड’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध केला आहे. सर्वजण सोनूचं कौतुक करत आहेत. याशिवाय आत लोकांनी त्याचं कौतुक करत त्याचे आभार मानायला सुरुवात केली आहे.

महिलेनं मुलाचं नाव ठेवलं सोनू सूद

एका ट्विटर युजरनं सोशल मीडियावरून एका महिलेची स्टोरी सांगितली आहे. असं सांगितलं आहे की, एका महिलेला मुंबईवरून दरभंगा येथे जायचं होतं. यावेळी ही महिली गर्भवती होती. अशा स्थितीत सोनू सूदनं पुढे येत तिची मदत केली. महिला सुखरूप दरभंलाला पोहोचली. आता त्या महिलेनं आपल्या बाळाचं नाव सोनू सूद ठेवलं आहे. या युजरनं कौतुक करत लिहिलं क, “काम बोलतं, त्या कामाची इज्जतही होते, त्या इज्जतीला नाव दिलं जातं.

अ‍ॅक्टर म्हणाला सर्वात मोठा अवॉर्ड

सोनू सूदनं ट्विट करत त्या महिलेचे आणि युजरचे आभार मानले आहेत. सोनूनं लिहिलं की, “हा माझा सर्वात मोठा अवॉर्ड आहे.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like