Coronavirus : 14 अन् 15 दिवस नव्हे तर इतके दिवस शरीरात राहू शकतं ‘कोरोना’चं संक्रमण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि त्याच्या उपचाराच्या प्रक्रियांबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. एवढेच नाही तर कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं देखील समोर येऊ लागली आहेत. सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं कोरोनाची असल्याचे सांगण्यात येत होते. इतकेच नाही तर आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमधून समोर आलं होतं की, भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांमध्ये 69 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच दिसली नाहीत. दरम्यान कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या एका सक्रिय सदस्यांनी दावा केला की, कोरोना व्हयरसचं संक्रमण 14 दिवस नाही तर त्यापेक्षा अधिक दिवस शरीरात राहू शकतं.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड 19 सोबत लढण्यासाठी भारतातील सर्वच राज्यांमध्ये विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. जेणेकरून कोरोना संक्रमित रुग्णावरील उपचार आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेसोबतच वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवता यावं. अशातच टास्क फोर्स भाग राहिलेल्या सदस्याने याबाबत सांगितले की, कोरोना व्हायरस संक्रमणाला आपली सायकल पूर्ण करण्यासाठी 14 दिवसांचा काळ फार कमी आहे.

टास्क फोर्समधील सदस्याने सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या काही रुग्णांमध्ये असे आढळून आले की या रुग्णामध्ये 14 दिवसांपेक्षा अधिक काळ कोरोनाची लक्षण कायम होती. ते म्हणाले की, सुरुवातीला असं मानलं गेलं की, 14 दिवसांच्या सायकलनंतर कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असेल, पण कोरोना व्हायरसला त्याची सायकल पूर्ण करण्यासाठी जवळपास 28 दिवसांचा कालावधी लागतो.

या सदस्याने असाही दावा केली आहे की, 14 दिवसानंतर रुग्णात सायटोकीन स्टॉर्म सुद्धा बघायला मिळालं. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टनुसार, हे एक प्रकारचं इम्यून सिस्टीम असतं जे रक्तात अनेक सायटोकींस फार वेगाने सोडतो. हे इम्यून रिस्पॉन्सला नॉर्मल करण्यासाठी प्रभावी मानलं जातं.

सध्या संक्रमणाचा धोका बघता जर या गोष्टींकडे गंभीरतेने पाहिलं तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी 20 दिवसांपर्यंत दूरच ठेवलं पाहिजे. सध्या याचे काही ठोस पुरावे नाहीत की, कोरोना व्हायरस सर्वच रुग्णांमध्ये 28 दिवस राहतो. त्यामुळे डॉक्टराकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा.