Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’चं पालन केलं नाही तर ‘कोरोना’च्या संक्रमणाचा धोका अधिक वाढणार : तज्ञ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकांनी यापुढे घरामध्ये राहण्याच्या नियमांचे पालन केले नाही तर कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन काटेकोरपणे करावे लागतील. समुदाय पातळीवर संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे.

लॉकडाऊन कोरोनाचा वेग थांबवेल
देशातील प्रमुख रुग्णालयीन गटांच्या डॉक्टरांनीही हा इशारा दिला आहे की, या बंदीमुळे व्हायरचा संसर्ग होण्याची गती कमी होईल आणि या काळात कोविड -19 च्या तपासणीसह इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करावे लागेल. सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. अरविंद कुमार म्हणाले की, ‘अलीकडेच हजारो लोक इतर देशांमधून परत आले आहेत आणि बर्‍याच जणांची स्क्रिनिंग केली नाही आणि बरेचजण बाहेर फिरत आहे. त्याचबरोबर, गरीब लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. सरकार या सर्व लोकांच्या घराबाहेर पहारा देऊ शकते? दीड अब्ज लोकसंख्या असलेला हा देश आहे ! लोकांनी चुका केल्या तर त्याचा प्रसार पुन्हा होईल.

ते म्हणाले की, भारताचे लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरिया सारख्या इतर देशांपेक्षा खूपच वेगळे आहेत, म्हणूनच बंदीच्या नियमांचे उल्लंघन जर लोक करत राहिले तर हा संसर्ग ज्ञात संपर्कांच्या पलीकडे जाण्यास सुरूवात होऊ शकेल. फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ.विवेक नांगिया यांनीही सांगितले की, ‘ही महामारी युद्धाच्या परिस्थितीपेक्षा अधिक धोकादायक आहे.’

ते म्हणाले की, ‘या युद्धामध्ये लोकांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे. सरकारच्या म्हणण्यानुसार, आपण संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत आणि ही बंदी व्हायरसची संख्या कमी करण्यात खूप प्रभावी ठरू शकते. डॉ. नानगिया म्हणाले की, जर जनतेने बंदीच्या नियमांचे पूर्ण काटेकोरपणे पालन केले तर दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळानंतर त्याचा परिणाम दिसून येईल.