Lockdown : वर्क फ्रॉम होम दरम्यान करा ‘ही’ एक्सरसाइज, राहाल नेहमी ‘फिट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनमध्ये घरी असल्याने बर्‍याच लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लोकांना व्यायामशाळेत किंवा बाहेर फिरायला जाता येत नाही, पण ते घरीही काही खास व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवू शकतात. घराबाहेर काम करणाऱ्या लोकांच्याही पाठीच्या आणि पायाच्या दुखण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. हा व्यायाम केल्याने त्यांना त्रास होत असताना देखील आराम मिळेल.

एक्सरसाइजची सुरुवात ३० सेकंदाच्या जॉगिंगसह करा. एकाच ठिकाणी उभे राहून किंवा पंजावर बसून उडी मारुन देखील करू शकता. पायांच्या एक्सरसाइज मध्ये लेग स्क्वॅट्स सर्वोत्तम मानले जातात. पायांना मागे व पुढे करण्यासाठी चेअरचा आधार देखील घेऊ शकता. या दरम्यान पाठ सरळ असली पाहिजे.

जर घरी व्यायाम करण्याची सवय नसेल तर मग अगदी हलक्या व्यायामाने सुरुवात करा. हळू-हळू गुडघ्यावर बसा. यानंतर खुर्चीवर बसा आणि आपले पाय समोर ठेवा. १० सेकंदानंतर खाली ठेवा. यामुळे स्नायूंनाही आराम मिळतो. यादरम्यान पायांवर काही जड वस्तू देखील ठेवू शकता.