Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य खात्याचे (Central Health Department) सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी शनिवारी दहा राज्यांची बैठक घेऊन तेथील कोरोना (Coronavirus) स्थितीचा आढावा घेतला. यावेळी देशात 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना (Coronavirus) संसर्गदर (infection rate) असलेले 46 जिल्हे आहेत. त्यामुळे तेथे कडक निर्बंध (strict restrictions) लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओदिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश, मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत असेही केंद्राने म्हंटले आहे.

कोरोनाचा ईशान्य भारतामध्ये झपाट्याने होणारा फैलाव धोकादायक असून तो नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने तेथील राज्यांनाही काही (central warning 10 states) सूचना केल्या आहेत. सध्याची परिस्थिती हाताळणे खूप महत्त्वाचे आव्हान आहे. निष्काळजीपणा दाखवल्यास खूप मोठे नुकसान सोसावे लागेल, असा सावधानतेचा इशाराही केंद्राने राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह 10 राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी अनेकजण घरात विलगीकरण मध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याने जिल्हानिहाय सिरो सर्वेक्षण (Siro survey) करावे. याबरोबरच लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवावा. लसीकरण करत असताना 45 ते 60 वर्षे तसेच 60 वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. कारण कोरोनाचा जास्त त्रास याच वयोगटातील लोकांना सहन करावा लागला आहे.

Coronavirus | strict restrictions infection rate above 10 central warning 10 states including maharashtra

तयारीचा आढावा

कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरत असल्याचे चित्र पहायला मिळत असताना पुन्हा एकदा दररोज 40 हजार बाधित देशात आढळून येऊ लागले आहेत. गेल्या काही आठवड्यापासून असेच चित्र दिसत आहे. दररोज नवे रुग्ण सापडणे ही स्थिती चांगली नाही. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या 46 जिल्ह्यांमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, उपलब्ध लसींची संख्या, रुग्णशय्या, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आढावा घेतला.

चाचण्यांचा वेग वाढवा

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने काही सूचना देखील केल्या आहेत. देशातील 53 जिल्ह्यांमध्ये
संसर्गदर 5 ते 10 टक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोरोना चाचण्यांचा वेग वाढवावा. तिथे वेळीच नीट लक्ष न दिल्यास स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. एकट्या केरळमध्ये कोरोनाचे 33 लाख रुग्ण असून तेथील स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीला केंद्र सरकारने (Central Government) नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (National Center for Disease Control) या संस्थेतील सहा तज्ज्ञांचे पथक पाठविले आहे.

हे देखील वाचा

Pocso Court | अल्पवयीन मुलींचा हात पकडणे आणि आपले प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नाही, पॉक्सो कोर्टाचा निर्णय

One Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला मेसेज, ’एक कोटी द्या अन्यथा…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Coronavirus | strict restrictions infection rate above 10 central warning 10 states including maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update