‘कोरोना’ला रोखण्यासाठी Social distance नाही फायदेशीर? वैज्ञानिकांचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जागतिक आरोग्य संस्थाच्या (WHO) एका मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी दोन लोकांमधील अंतर ६ फूट असेल तर व्यक्तीला कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी असले. परंतु, एक संशोधनांमधून या WHO च्या सूचनांवर सवाल केले जात आहे. या अंतराने काही फरक पडणार नाही. मग ते ६ फूट असो अथवा ६० फूट. खासकरून तेव्हा जेव्हा व्यक्ती घरासारख्या इनडोअर ठिकाणी असेल. असा दावा मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील वैज्ञानिकांनी केला आहे.

वैज्ञानिक म्हणते –
वैज्ञानिकांनी या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी संक्रमणाला प्रभावित करणाऱ्या विविध कारणांचं विश्लेषण केलं. तर, Air filtration, immunization, विविध स्ट्रेन आणि इनडोअर ठिकाणांवर घालवला गेलेला वेळ. त्यासोबतच वैज्ञानिकांनी श्वसन प्रक्रिया जसे की, श्वास घेणे, जेवण करणे, बोलणं किंवा गाणं गाणे इत्यादींवर लक्ष दिलं. तसेच, एमआयटीचे प्राद्यापक मार्टिन बॅंजेटने CNBC सोबत बोलताना सांगितले की, ६ फुटाचा तसा काही फायदा नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या इनडोअर ठिकाणी असाल. जेव्हा व्यक्ती मास्क लावते तेव्हा ती वेगाने श्वास घेते आणि सोडते. अशात त्यांच्याकडून सोडण्यात आलेला श्वास रूममध्ये आजूबाजूला पसरतो. ज्याने दूर उभ्या असलेल्या व्यक्तीलाही स्पर्श होऊ शकते.

कुणीही नाही सुरक्षित?
वैज्ञानिकांनी अमेरिकेतील CDC आणि WHO द्वारे मागील वर्षी जारी केलेल्या कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांवर सवाल उठवले आहेत. यामध्ये, कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आतमध्ये आणि बाहेर या दोन्ही ठिकाणांवर लोकांमध्ये ६ फुटाचं अंतर असलं पाहिजे. US National Academy of Sciences च्या प्रोसिडींगमध्ये मागील आठवड्यात प्रकाशित या रिसर्चमध्ये म्हटलं आहे, मिश्रित ठिकाणांवर हवेतून पसरणाऱ्या विषाणूपासून कुणीही सुरक्षित नाही. तसेच, जर ते ६ फुटाचं अंतर असो किंवा ६० फुटाचं असो. भलेही त्यांनी मास्क लावला असुदे.

या दरम्यान, CDC आणि WHO ने मार्गदर्शक सूचना जारी करताना इनडोअर ठिकाणांवर घालवल्या जाणाऱ्या वेळेवर लक्ष दिलं नाही. जे अधिक आवश्यक आहे. संशीधनामध्ये असे म्हटले की, अनेक वेळा जागा मोठी असते. तिथे वायुवीजन चांगलं असतं. लोकांकडून एकत्र घालवण्यात आलेला वेळही अधिक नसतो. यामध्ये अशाप्रकारची ठिकाणे जर पूर्ण क्षमतेसोबत खुले राहतील तर कोणताही धोका नसेल. असे मार्टिन बॅंजेट यांनी म्हटलं आहे.