Coronavirus : डोळ्याचा रंग बदलल्यास सावधगिरी बाळगा, होऊ शकता ‘कोरोना’चे शिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा कहर सतत सुरूच आहे. नवीन लक्षणे समोर येत आहेत. दरम्यान, आता अभ्यासात कोरोना विषाणूचे नवीन लक्षण समोर आले आहे. जर डोळ्याचा रंग बदलत असेल तर ते कोरोना विषाणूचे लक्षण असू शकते. कॅनडियन नेत्रविज्ञानच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की डोळ्याचा रंग बदलून गुलाबी होणे हे कोरोना विषाणूचे लक्षण असू शकते.

त्या संशोधनाचा हवाला देत पीटीआयने एका अहवालात सांगितले की संशोधकांनी असे नमूद केले आहे की मार्चमध्ये एक 29 वर्षीय महिला रॉयल अलेक्झांड्रा हॉस्पिटलच्या नेत्र संस्था अल्बर्टा येथे याच लक्षणांसह पोहोचली. त्या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक कार्लोस सोलर्ट म्हणाले की या प्रकरणातील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे या आजाराचे मुख्य कारण श्वास घेण्यास त्रास होणे हे नसून डोळ्यांचा रंग बदलणे हे होते. आणि त्या महिलेची कोरोना टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे त्या महिलेला ताप आणि खोकलाही नव्हता.

तथापि यापूर्वी देखील अमेरिकेच्या नेत्र रोग तज्ञांच्या असोसिएशनने कोरोना रूग्णांमधील डोळ्यांच्या लक्षणांवर आधारित एक शोधपत्रिका अपडेट केली होती, यामध्ये सांगण्यात आले होते की रुग्णांना तपासणारे नेत्ररोगतज्ज्ञ कोरोनाशी संबंधित सामान्य लक्षणांबद्दल रुग्णांना विचारतात आणि जर रुग्ण या लक्षणांबाबत सांगत असेल तर त्याला कोरोना विषाणूची चाचणी घेण्याचा सल्ला दिला जातो.

अमेरिकन तज्ञांपूर्वी चिनी संशोधकांनी केलेल्या संशोधनात देखील असे मानले गेले आहे की डोळ्याच्या अश्रूमुळे देखील कोरोना विषाणूचा प्रसार होतो. कोरोना विषाणूच्या 38 रूग्णांवर हे संशोधन केले गेले असून जवळपास डझनभर संक्रमित व्यक्तींचे डोळे गुलाबी रंगाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वास्तविक, जेव्हा कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधून पसरू लागला, तेव्हा त्यातील दोन लक्षणे ही मुख्य असल्याचे मानले गेले. कोरडा खोकला आणि ताप ही त्याची मुख्य लक्षणे होती. नंतर, विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, श्वास घेण्यात अडचण येण्याची लक्षणे दिसू लागली. आता कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये एक नवीन गोष्ट जोडली गेली आहे की जर तुमचे डोळे गुलाबी होत असले तर तुमच्यात कोरोना विषाणूची लक्षणे दिसू शकतात.

कोरोना विषाणूच्या इतर मुख्य लक्षणांबद्दल बघितले तर श्वास घेण्यात अडचण होणे, ताप, खोकला, सर्दी आणि शरीरात वेदना होणे ही लक्षणे समाविष्ट आहेत. या सर्वांव्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये इतर अनेक प्रकारची लक्षणे आढळतात. ज्यामध्ये वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता संपते, घसा खवखवणे देखील कोरोनाच्या मुख्य लक्षणांपैकी एक मानले गेले आहे. आणि आता डोळ्याचा रंग गुलाबी होणे हे देखील कोरोनाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट झाले आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन लोकांना सतत सामाजिक अंतर बनविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तथापि, आर्थिक क्रियाकलाप सुरू करण्यासाठी अनलॉक -1 लागू आहे. आतापर्यंत या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी कोणतीही लस तयार झालेली नाही. परंतु त्याच्या लक्षणांच्या आधारे डॉक्टर त्याच्या उपचारांमध्ये इतर आवश्यक औषधे वापरत आहेत. तथापि, अनेक देशांमध्ये त्याची लस बनवण्याचे काम सुरू आहे.