Lockdown : ‘घरात थांबल्यास दारूची दुकानं लवकर उघडतील’, ‘कॉमेडियन’ सुनीलनं शेअर केला ‘मजेदार’ व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउन केला आहे. आज या लॉकडाउनचा 10 वा दिवस आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका, असे बजावले असतानादेखील काही नागरिक मुद्दाम या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांवर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच विनोदवीर सुनील ग्रोवरनेदेखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. घरात रहाल तर दारूची दुकाने लवकर उघडतील असे त्याने म्हटले आहे.

View this post on Instagram

Choice is yours ! Theka alert!

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी अनेकजण काम करीत आहेत. दरम्यान, या कठीण कालावधीत नागरिकांनी घरात रहावे यासाठी सुनीलने हटके पद्धतीने आवाहन केले आहे. जर तुमची इच्छा असेल की दारुची दुकाने लवकरच सुरु व्हावीत. तर सध्या शांतपणे घरीच बसा. उगाच अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका. कारण नसताना बाहेर पडलात तर आपल्यावर ओढावलेल्या संकटात भर पडेल आणि तुम्हाला हवी असलेली दारुची दुकानेही सुरु व्हायला तितकाच वेळ लागेल, असे सुनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. व्हिडीओ मजेशीर अंदाजात तयार केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे करोनामुळे केंद्र सरकारने लॉकडाउन केल्यापासून दारुची दुकाने व बार बंद झाले. त्यामुळे अनेक तळीराम अस्वस्थ झाले असून ते दारुच्या शोधात सतत घराबाहेर पडताना दिसतात.