केस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का ? जाणून घ्या त्याची कारणे

पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. जगातील मोठे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ या साथीच्या लसी शोधण्यात गुंतले असताना, रोज कोरोनाची नवीन लक्षणे समोर येत आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, कोरोना झालेल्या लोकांमध्ये केस गळण्याची समस्या उद्भवली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे म्हणजे ताप, खोकला, सर्दी, चव वगैरे ही होती. आता केस गळतीची समस्या देखील यात जोडली गेली आहे. कसे गळणे कसे टाळावे हे जाणून घेऊया …

कोरोना विषाणू आणि केस गळतीचे संबंध
एका संशोधनानुसार केस गळणे हे कोरोना विषाणूच्या लक्षणांपैकी एक आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव दीर्घकाळ चालला आहे त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक दिसून आली. काही रुग्णांमध्येच केस गळतीची समस्या का दिसून आली हे अजून तज्ज्ञ सिद्ध करू शकले नाहीत.

विषाणूमुळे का गळत आहेत केस?
कोरोना रूग्णांच्या मनात हा प्रश्न पडला आहे की त्यांचे केस का गळत आहेत. याचे कारण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले नाही, परंतु ते “टेलोजेन एफ्लुव्हियम” म्हणून ओळखले जात आहे. टेलोजेन इफ्लुव्हियममध्ये काही रोग किंवा धक्क्यामुळे केस काही काळ गळतात. कोरोनामुळे उद्भवणारा ताण आणि चिंता देखील याला एक कारण असू शकते. या व्यतिरिक्त, या आजारामुळे शरीरात पुष्कळ पोषक तत्वांचा अभाव असतो, ज्यामुळे केस गळणे सुरू होते.

केस गळतीवर काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांना काही काळ केस गळतीची समस्या होईलच. म्हणूनच, रुग्णांना ताणतणावाचा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केसांच्या वाढीस आवश्यक असणारे लोह, व्हिटॅमिन-डी आणि इतर पौष्टिक पदार्थ खावे ज्यामुळे केस गळणे कमी होण्यास मदत होईल. तुमची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी योगासने करा. आपण या रोगाचा पराभव करताच, सर्व समस्या स्वत: कमी होतील.

केस गळणे कधी कमी होईल?
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की टेलोजन एफलुवियममुळे केसांची नवीन वाढ थांबते. काही काळानंतर ते गळण्यास सुरूवात होते. कोरोना रूग्ण बरे झाल्यानंतर काही आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत केस गळत राहतात. कारण त्यांना त्या धक्क्यातून बाहेर यायला काही वेळ लागतो. जेव्हा हळूहळू रुग्ण शारीरिकरित्या बरे होऊ लागतो, तेव्हा त्यांच्या केसांची गळती कमी होत जाते.

You might also like