‘कोरोना’तून बरे झालेल्या लोकांमध्ये 2 महिन्यानंतर दिसतायेत ‘हे’ गंभीर लक्षणं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात हाहा:कार माजवला आहे. अमेरिका, इटली, रशियाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असल्याने एक मोठा दिलासा देशवासियांना मिळाला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. हा आकडा जरी मोठा असला तरीही इटलीच्या संशोधकांनी रुग्ण बरा झाल्याच्या दोन महिन्यानंतर मोठा इशारा दिला आहे. JAMA जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहवालात याबाबत नमूद करण्यात आले आहे.

इटलीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोना झाल्यानंतर दोन महिन्यांनी देखील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना दमल्यासारखे वाटत आहे. इटलीमध्ये 143 बरे झालेल्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते. यापैकी 90 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यानंतर 2 महिन्यांनी काही लक्षणे दिसत होती. थकवा जणवने, श्वास घेण्यामध्ये त्रास होणे, गुडघेदुखी सारखी लक्षणे दिसून येत आहेत.
रोमच्या एका हॉस्पिटलचे डॉक्टर अँजेलो कार्फी यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार अभ्यासामध्ये केवळ 12.5 टक्के कोरोना बाधितांनाच 60 दिवसांनी या लक्षणापासून मुक्तता मिळू शकली आहे. अभ्यासावेळी या बरे झालेल्या रुग्णांनी सांगितले की, त्यांचे आयुष्य बदलले आहे. आधीसारखेच चांगले आयुष्य जगता येत नाही. तज्ज्ञांनी हा अभ्यास खूपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी एका अभ्यासामध्ये कोरोनामुळे ज्या लोकांमधील चव आणि वास घेण्याची शक्ती गेली होती. त्यापैकी 10 टक्के रुग्णांचे एक महिना झाला तरीही हे लक्षण पाठ सोडत नव्हते. कोरोना हा नवा आजार असल्याने डॉक्टरांनाही याबाबत काहीच कल्पना नाही. यामुळे सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांवर कोरोनाचा होणारा परिणामांचा अभ्यास केला जात आहे.

इटलीतील अभ्यासामध्ये आणखी एक बाब समोर आली आहे. कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांपैकी 55 टक्के लोकांना दोन महिन्यानंतर तीन किंवा त्याहून अधिक लक्षणे दिसून येत आहेत. तर 32 टक्के रुग्णांमध्ये एक किंवा दोन लक्षणे दिसून येत आहेत. 43 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तर 21 टक्के लोकांना छातीत दुखत होते. हे सर्व रुग्ण उपचारानंतर निगेटिव्ह आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like