Coronavirus : रुग्णालयातून पळालेला ‘कोरोना’ संशयित डॉक्टर ‘बेशुद्ध’, व्हेंटिलेटरवर ठेवलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यात 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडिया आणि अपवांचे पीक जोमात असल्यामुळे अनेकांचे धाबे दणादले आहेत. याच परिस्थितीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरहून भुसावळला आलेल्या 30 वर्षीय डॉक्टरची प्रकृती अचानक खालवल्यामुळे खळबळ उडाली. या डॉक्टरला ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली नाही असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र काही तासांतच डॉक्टर बेशुद्ध पडल्याने त्यांना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या असलेली लक्षणं ही कोरोना व्हायरससोबत जुळणारी असल्याने त्यांच्या काही टेस्ट पुन्हा केल्या जाणार आहेत. 30 वर्षीय डॉक्टरची प्रकृती खालवल्याने ते बेशुद्ध होऊन पडले. त्यामुळे त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

संबंधित डॉक्टर कोणताही परदेशी दौरा करून आला नसून परदेशी दौरा केलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला नव्हता. तरीही त्यांचे सीमटर्म हे कोरोना व्हायरसला समांतर आहेत. मात्र कुटुंबियांचा दावा आहे की त्यांना कोरोना व्हायरस नाही. मात्र, काही चाचण्यांनंतर हा गोंधळ अधिक स्पष्ट होईल असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

कोरोना होईल या भीतीने संबंधित डॉक्टरने चार रुग्णालयातून पळ काढला होता अशीही एक माहिती समोर आली आहे.