Coronavirus : मराठवाड्यात ‘कोरोना’ची एन्ट्री ? पोलिसालाच ‘लक्षणं’ आढळल्यानं खळबळ

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. करोना व्हायरसने मराठवाड्यात एन्ट्री केली असून मराठवाड्यातील जलना येथे कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यामध्ये कोरोना व्हायरची लक्षणे आढळून आल्याने पोलीस दलासह शहरात खळबळ उडाली आहे.

संशयित रुग्ण हा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहे. मुंबई येथे कर्तव्य बजावत असताना इस्रायली कमांडोच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णाने यापूर्वी मुंबईत असताना पोलीस रुग्णालयात चार ते पाच दिवस प्राथमिक उपचार घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील दोन दिवसांपासून परत सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने आज तो स्वत:हून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला.

डॉक्टरांनी या रुग्णाला कोरोनासाठीच्या विशेष अशा आयसोलेशन वॉर्डात हलविले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सदर रुग्णाच्या स्वॅब टेस्टिंगाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून या रिपोर्टवरूनच तो कोरोना पॉझिटीव्ह आहे की निगेटिव्ह हे स्पष्ट होईल. जिल्हा शल्य चिकित्सक आणि महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक या रुग्णाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.