Corona : मुलांमध्ये दिसतात कोरोना व्हायरसची ‘ही’ लक्षणे, घरात कशी करावी त्यांची देखभाल?; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – डॉक्टरांनुसार मुलांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे खुप कमी दिसतात किंवा अजिबात दिसतही नाहीत. अशावेळी लक्षणे ओळखून उपाय केले पाहिजेत, जेणेकरून आजार गंभीर होऊ नये.

केंद्र सरकारचे ट्विटर हँडल माय गव्हर्मेंट इंडियावर याबाबत माहिती दिली आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, जी मुले कोविड- 19 ने प्रभावित आहेत अशा बहुतांश मुलांमध्ये हलका ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, थकवा, घशात खवखव, अतिसार, चव आणि वास न येणे, मांसपेशींमध्ये वेदना आणि सतत नाक वाहणे अशी लक्षणे आहेत. याशिवाय काही मुलांमध्ये पोट आणि आतड्यांशी संबंधीत समस्यांसह काही असामान्य लक्षणे सुद्धा आहेत.

रिसर्चनुसार, मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम नावाचा एक नवा सिंड्रोम सुद्धा दिसून आला आहे. हा आजार नसून लक्षणांवर अधारित एक सिंड्रोम आहे. मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोमने पीडित मुलांमध्ये हृदय, फुफ्फुसे, रक्त वाहिन्या, मूत्रपिंड, पचनक्रिया, मेंदू, त्वचा किंवा डोळ्यांमध्ये इन्फेक्शन आणि सूज दिसून आली आहे. याची सामान्य लक्षणे जसे की, सतत ताप येणे, उलटी, पेटात वेदना, त्वचेवर चट्टे, थकवा, धडधड वाढणे, लाल डोळे, ओठांवर सूज, हातापयांवर सूज, डोकेदुखी, शरीराच्या भागात गाठ येणे याचा समावेश आहे.

जर घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाले तर अशावेळी आवश्यक आहे की, मुलांमध्ये लक्षणे दिसली नाहीत तरी त्यांचे स्क्रीनिंग करावे. मुलांमध्ये सामान्य लक्षणे जसे की, घशात खवखव, खोकला, मांसपेशीमध्ये वेदना किंवा पोटाशी संबंधित समस्या असल्यास चाचणीची आवश्यकता नाही. अशा मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार करता येतो.

डॉक्टरांनुसार, मुलांमध्ये ताप आल्यास प्रत्येक 4 ते 6 तासांनी पॅरासिटामोल 10-15 एमजी/केजी चा डोस घेऊ शकता. घशात खवखव किंवा कफ झाल्यास मुले आणि तरूण दोघांनी गरम पाण्यात थोड मीठ टाकून गुळण्या कराव्यात. मुलांना ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन आणि पोषकतत्व युक्त डाएट द्यावे.