Coronavirus Symptoms | संशोधनात दावा : महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असतात कोरोनाची लक्षणे, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांनी सुद्धा राहावे सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीच्या एका नव्या संशोधनात दावा केला जात आहे की, कोरोनाची महिला आणि पुरुषांमध्ये लक्षणे (Coronavirus Symptoms) वेगवेगळी असतात. लंडनच्या प्रसिद्ध किंग्ज कॉलेजच्या संशोधकांनी नजए कोविड लक्षणे स्टडी अ‍ॅपवरून डेटाचे विश्लेषण केले आणि या निष्कर्षावर पोहचले. हे संशोधन लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. कोरोनाच्या या लक्षणांबाबत (Coronavirus Symptoms) जाणून घेवूयात.

महिलांमध्ये कोरोनाची 5 सामान्य लक्षणे

वास घेण्याची क्षमता जाणे
छातीत वेदना होणे
 सतत खोकला
पोटात वेदना
ताप

पुरुषांमध्ये कोरोनाची सर्वात पाच लक्षणे

थकवा
श्वास घेण्यास अडचण
थंडी लागणे
ताप
वास घेण्याची क्षमता जाणे

व्हॅक्सीन दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे
संशोधकांना वय, लिंग, वजन, बीएमआयसारख्या गटांत लक्षणेसुद्धा वेगवेगळी असू शकतात. ज्या लोकांनी व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांच्यात डोकेदुखी, घशात खवखव, शिंक येणे, नाक वाहणे आणि वास घेण्याची क्षमता जाणे कोरोनाचे सर्वात सामान्य लक्षण आहे.

सतत खोकला, ताप असेल तर कोरोनाची आवश्य तपासणी करा. व्हॅक्सीनचा एक डोस घेतलेल्यांमध्ये सुद्धा संक्रमित झाल्यानंतर डोकेदुखी, नाक वाहणे, घशात खवखव, शिंक येणे, सतत खोकला ही लक्षणे दिसतात.

Web Title :- coronavirus symptoms differ among age groups men and women covid 19 new study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत

Jalgaon Crime | जळगावमधील 2 तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या, प्रचंड खळबळ

Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी