Covid-19 Treatment : ‘कोरोना’चे चौथे ‘लक्षण’ आहे ‘मळमळ’ किंवा ‘उलटी’ होणं, यावर 10 घरगुती उपायांनी मिळेल ‘आराम’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना वायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यादरम्यान, संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये लक्षणे दिसण्याच्या संभाव्य क्रमाचा शोध घेतला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड-19 च्या रूग्णाचे पहिले लक्षणे आहे ताप, दुसरे खोकला, तिसरे मांसपेशींमध्ये वेदना, चौथे लक्षण मळमळ किंवा उलटी होणे, हे आहे. हा अभ्यास फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

संशोधकांचे हे देखील म्हणणे आहे की, लक्षणे समजताच उपचार सुरू केल्यास आजारावर नियंत्रण मिळवण्यात मदत होऊ शकते. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधीत यंत्रणा आणि डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधणे जरूरी आहे. सामान्यपणे मळमळ आणि उलटीवर कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेवूयात…

हे उपाय करा.
1 लिंबू पाणी
एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून घ्या. त्यामध्ये साखर आणि थोडे मीठ मिसळून थोड्या-थोड्या वेळाने पित राहा.

2 कांदा
एक चमचा कांद्याचा रस घ्या. त्यामध्ये एक चमचा आले वाटून मिसळा. हे मिश्रण थोड्या थोड्यावेळाने घ्या. कांदा आणि धन्याचा रस प्यायल्याने उलटी ताबडतोब बंद होते.

3 काळी मिरी
तीन-चार काळी मिरी घेऊन चघळा. यामुळे उलटीत आराम मिळतो. 5-6 काळी मिरी घेऊन कारल्याच्या पानांमध्ये वाटून घ्या. हे प्यायल्याने उलटी थांबते.

4 आले
आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहे. आल्याचा चहा करून पिऊ शकता.

5 बडीसोप
यातील अँटी-एमेटिक गुणामुळे उलटी आणि मळमळ थांबते. बडीसोप नेहमीप्रमाणे थेट खाऊ शकता.

6 मीठ, साखर, पाणी
काही वेळा शरीरात सोडियम, पोटॅशियमसारख्या लवणांचा स्तर असंतुलित झाल्याने सुद्धा उलटी होते. अशावेळी मीठ आणि साखरेचे पाणी सेवन केल्याने शरीर क्रिया सामान्य होतात. मीठ आणि पाणी इलेक्ट्रॉलचे काम करते, ज्यामुळे उलटी थांबते.

7 संत्र्याचा रस
ताज्या संत्र्याचा ज्यूस सेवन केल्याने मळमळ, उलटीची समस्या थांबते. ब्लड प्रेशरचा स्तर सामान्य होतो.

8 बेकिंग सोडा
एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पाणी प्यायल्याने मळमळ दूर होते. चव सुद्धा पूर्ववत होते.

9 दालचीनी
पचनक्रिया बिघडल्याने मळमळ, उलटी होत असल्यास एक उकळत्या पाण्यात एक चमचा दालचीनी पावडर टाकून काही वेळ उकळवा आणि हे पाणी गाळून थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या. उलटी दूर होते.

10 जीरा
पोट खराब झाल्याने मळमळ, उलटी होत असल्यास जीर्‍याचे सेवन लाभदायक ठरू शकते.