Coronavirus Symptoms : कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा पडेल महागात

पोलीसनामा ऑनलाइनः देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरत आहे. डॉक्टरांंच्या म्हणण्यानुसार, ताप, खोकला आणि गंध जाणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, आता नवीन लक्षणे दिसू लागली आहेत. ज्याच्याकडे कधी कुणी लक्षच दिले नाही. खासकरून आवाजात होणारा बदलाकडे अनेकजन दुर्लक्ष करतात. मात्र, हे देखील कोरोनाचे लक्षण असू शकते.

एका रिपोर्टनुसार, कोविड लक्षण अ‍ॅपद्वारे दिलेल्या डेटानुसार, लोकांना कोरोनामुळे त्यांच्या आवाजात बदल झाल्याचे जाणवत आहे. लाखो लोकांनी दिलेल्या डेटातून समोर आले आहे की, कर्कश आवाज कोरोनाची लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नये. यूकेमध्ये अनेकांना कोरोनाची सुरूवात झाल्यावर कर्कश आवाज आणि विचित्र आवाजाचा अनुभव आला आहे. एका रिसर्चनुसार, काही लोकांना आपला आवाज बेढब तर काही लोकांना घोगरा जाणवला. तर मोठ्या आवाजात बोलणाऱ्या लोकांना त्यांचा आवाज हळुवार वाटला आणि आवाजात जडपणा वाटला. दरम्यान अनेकदा सर्दी-खोकला असल्याने आवाज बदलण्याची शक्यता आहे. पण या दिवसात आवाजात थोडाही बदल झाला तर दुर्लक्ष करू नका. कोरोनाचे हे लक्षण भलेही हलक असेल पण जर लक्ष दिल गेल नाही तर समस्या वाढू शकते. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल टेस्ट करून घ्यावी.

ही लक्षण दिसताच दुर्लक्ष करू नका, टेस्ट करून घ्या

1) ताप 3 दिवसापेक्षा जास्त राहत असेल तर कोरोना चाचणी करून घ्या.

2) अनेक दिवसांपासून खोकला येत असेल लगेच टेस्ट करा.

3) घशात खवखव होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका.

4) उन्हाळ्यातही नाक वाहत असेल किंवा भरत असेल तर कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता आहे. .

5) छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर थेट डॉक्टरांशी संपर्क साधा.

6) पदार्थांची टेस्ट लागत नसेल किंवा गंध येत नसेल कोरोनाची टेस्ट करून घ्यावी.