Coronavirus : नेमकी काय आहेत ‘कोरोना’ची लक्षणं, यापासून बचावासाठी ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूचा हाहाकार संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोना विषाणूग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत भारतात ७५ प्रकरणे समोर आली आहेत. पूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे ४९०० लोक मृत्यू पावले आहेत. तर १,३४,६७९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) ने कोरोनाला पॅंडेमिक म्हणून घोषित केले आहे. जाणून घेऊया कोरोना विषाणूचे लक्षण…

कोरोना विषाणूचे लक्षण:
– श्वास घेण्यास अडथळा होणे
– घसा खवखवणे, हलक्या वेदना होणे
– सर्दी, खोकला आणि अचानक ताप येणे
– सांधे दुखी
– या विषाणूग्रस्त लोकांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो

कोरोनाचे सीफूडशी आहे कनेक्शन :
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोना विषाणू हा एक सीफूडशी संबंधित आजार आहे. याची सुरुवात चीनमधून वुहानच्या सी-फूड बाजारातून झाली होती. डब्लूएचओ नुसार, हा विषाणू उंट, मांजर, वटवाघूळ समवेत अन्य प्राण्यांनंतर आता मनुष्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

कसा करावा कोरोना विषाणूचा उपचार :
आतापर्यंत कोरोना विषाणूची लस तयार होऊ शकली नाही. या विषाणूग्रस्त लोकांवर इतर औषधांद्वारे उपचार केले जात आहेत. कोरोना टाळण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये या गोष्टींचा जरूर समावेश करावा

  1. कोरोना विषाणू सी फूड पासून पसरतो, म्हणून सध्या कोणत्याही प्रकारचे मासे, कोळंबी आणि इतर काही समुद्री खाद्यांचा वापर टाळा.
  2. ऑफिस अथवा बाहेरील लोकांपासून हस्तांदोलन करणे टाळा. जर हात मिळवला जरी असेल, तरी त्यानंतर हात लगेचच साबणाने स्वच्छ धुवावेत.
  3. आजारी व्यक्तींपासून लांबच राहावे, विशेष करून ज्या लोकांना सर्दी, खोकला सारखे आजार असतील त्यांच्या संपर्कात येऊ नये.
  4. घरात पाळीव प्राणी असल्यास त्याला लस द्या. प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका.
  5. घराबाहेर पडताना तोंड झाकून ठेवा. शक्य असल्यास तोंडावर मास्क किंवा कपडा लावून घराबाहेर पडा.