Coronavirus : अभिनेत्री श्रिया सारनच्या पतीमध्ये आढळली ‘कोरोना’ची लक्षणं, डॉक्टरांनी उपचार न करताच घरी पाठवलं !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री श्रिया सारन हिनं एक चकित करणारा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, तिच्या पतीमध्येही कोरोनाची लक्षणं आढळली होती. परंतु सध्या मात्र तिचा पती पूर्णपणे ठिक आहे असंही तिनं सांगितलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना श्रियानं सांगितलं की, हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा ती पती आंद्रेई कोस्चीवसोबत स्पेनमध्ये होती. तेव्हा त्याला खूप ताप होता. तिला जाणीव झाली होती की ही कोरोनाची लक्षणं आहेत. तिनं सांगितलं की, यानंतर ती पतीला घेऊन तिथल्या रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. परंतु तिथल्या डॉक्टरांनी उपचार करण्यास मनाई केली.

डॉक्टरांनी सांगितलं की, जरी तुमच्या पतीला कोरोना झाला नसेल तरीही इथं राहिल्यानं मात्र नक्की होईल. त्यामुळं तुम्ही दोघंही घरी गेलात तर तेच तुमच्यासाठी चांगलं राहिल. यानंतर श्रिया पतीला घेऊन घरी आली आणि त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं. तिनं सांगितलं की, ती घरात राहूनच पतीवर उपचार करू लागली. परंतु यावेळी तिनं अंतर ठेवलं होतं असंही ती सांगते.

श्रिया सांगते की, पतीच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. हिंमतीनं आपण याचा सामना करायला हवा. आपण सावधानता बाळगत स्वत:ला फिट ठेवण्याची गरज आहे. तिनं सांगितलं की यामुळं ते त्यांची मॅरेज अॅनिवरसरीही सेलिब्रेट करू शकले नाहीत.