Coronavirus : ‘डोळे’ लालसर होणं देखील ‘कोरोना’ व्हायरसचं लक्षण, ‘आश्रू’ देखील पसरवू शकतात ‘संक्रमण’ : संशोधन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश सुरूच आहे, ज्यामुळे आतापर्यंत 1.35 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर 20.94 लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. आजपर्यंत त्याचे उपचार किंवा लसदेखील तयार झालेली नाही. तज्ञांनादेखील आता हे समजणे कठीण झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या रूग्णांमध्ये आणखी एक लक्षण समोर आले आहे, ज्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान ‘आश्रू’ देखील ‘संक्रमण’ पसरवू शकतात असे संशोधन समोर आले आहे.

डोळ्यात लालसरपणा देखील कोरोनाचं लक्षण

आतापर्यंत कोरोना वारायसच्या प्रमुख लक्षणांमध्ये कोरडा खोकला, उच्च ताप, धाप लागणे, थकवा यासारखे लक्षणे समाविष्ट आहेत, परंतु आता डोळ्यांचा लालसरपणा देखील त्याच्या लक्षणांमध्ये सामील झाला आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ ऑफ्थमालजिस्टच्या एका संशोधनाच्या आधारावर ‘कंजंक्टिवाइटिस’ ला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे आणखी एक लक्षण म्हणून ओळखले आहे, जे एक असामान्य लक्षण आहे. दरम्यान, या संदर्भात आणखी एक काळजीची बाब म्हणजे डोळ्यांमधील लालसरपणा कधीकधी सामान्य फ्लू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो आणि अशा परिस्थितीत हे समजणे कोणालाही कठीण जाऊ शकते कि,त्याला कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. संशोधनाच्या आधारे, तज्ञांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीस कन्जंगक्टवाइटिसची तक्रार असेल तर त्याने कोरोनाच्या इतर लक्षणांचीही काळजी घ्यावी.

चीनमध्ये केले गेले संशोधन

संशोधक असेही म्हणतात की केवळ डोळे लालसर होणे, जळजळ होणे, खाज सुटणे आणि डोळ्यांत पाणी येणे देखील कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे असू शकतात. दरम्यान, कोरोना क्रमित रुग्णांमध्ये ताप, खोकला, धाप लागणे ही मुख्य लक्षणे आहेत. माहितीनुसार, चीनमध्ये यावरही संशोधन केले गेले आहे आणि डोळ्यांतून अश्रूंच्या नमुन्यांची तपासणी करण्यात कोविड -19 बद्दल अनेक अहवाल सकारात्मक आले आहेत.

1 ते 3 % रुग्णांमध्ये ही लक्षणे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) द्वारे डोळ्यातील लालसरपणा किंवा ‘ कन्जंगक्टवाइटिस ‘ कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सामान्य लक्षण म्हणून नोंदविला गेलेला नाही. तज्ञ असेही म्हणतात की हे लक्षण कोरोना रूग्णांपैकी केवळ 1-3 टक्के रुग्णांमध्ये आढळून आले आहे आणि जर एखाद्याने फक्त “ कन्जंगक्टवाइटिस ” ची तक्रार केली असेल आणि संसर्गाची लक्षणे दिसली नाहीत तर फार काळजी करण्याची गरज नाही, परंतु खबरदारी म्हणून जागरूक आणि सतर्क राहणे खूप महत्वाचे आहे. कारण सामान्य लक्षणे दिसण्यापूर्वी 14 दिवस आधी कोरोना संक्रमण होऊ शकते.