Coronaviurs : डोळे लाल होणं हे ‘कोराना’चं लक्षण आहे का ? नर्सनं केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन –  वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप येतो. मात्र, मागील कहाी दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीमुळे सर्दी, ताप, खोकल्यानंतर रुग्णालयामध्ये उपचारासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे सतत सर्दी, उच्च ताप, खोकला, छातीत वेदना याशिवाय डोळे लाल होणेही कोरोनाव्हायरसचे लक्षण असू शकते. असे मत कोरोना रुग्णावर उपचार करणार्‍या टीममधील नर्सने सांगितले आहे. रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची इतर लक्षणे दिसलेली नाहीत, त्यांचे डोळे लाल असल्याचे बहुतांश कोरोना संशयितांमध्ये दिसून आले आहे.

किकर्लंडच्या लाइफ केअर सेंटरमध्ये काम करणार्‍या नर्स चेल्सी अर्नेस्ट यांना अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांचे डोळे लाल झालेले दिसले असल्याची माहिती दिली आहे. किर्कलँडमध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. ’कोरोनाव्हायरस झालेल्या जवळपास प्रत्येक रुग्णाचे डोळे लाल झाले होते. ’या रुग्णांच्या डोळ्यांच्या आतील पांढरा भाग लाल नव्हता तर डोळ्यांच्याभोवती लाल वर्तुळ तयार झाली होती.

संबंधित रुग्णाला पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना अ‍ॅलर्जी झाली आहे. असे वाटले होते. मात्र, आमच्याकडे असे अनेक रुग्ण आले, ज्यांचे फक्त डोळे लाल होते, त्यांच्यामध्ये व्हायरसची इतर लक्षणे नव्हती. ज्यांचे डोळे लाल आहेत, मात्र दुसरी कोणती लक्षणे नाहीत, अशा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती चेल्सी यांनी दिली आहे.

अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थलमोलॉजीने रविवारी एक अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये व्हायरसच्या संसर्गामुळे कंजेक्टिवायटिस होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होण्यासह डोळे लालही होतात. मात्र सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने डोळे लाल होणे हे कोरोना व्हायरसचे लक्षण नसल्याचे सांगितले आहे.