Coronavirus impact : भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ आता पिंपरीतही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून, हाच भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ आता पिंपरीतसुद्धा राबवला जात आहे.

सर्व जग कोरोनाशी दोन हात करत लढा देत आहेत. या गंभीर परिस्थितीत लोकांना कोरोनाशी कसे लढायचे या साठी जनजागृती करणे महत्वाचे आहे. सुरक्षेची खबरदारी न घेता नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान व धर्मरक्षा समिती खराळळवाडी यांच्या माध्यमातून किराणा दुकान, डेअरी, दवाखाना ,मेडिकल, महापालिका आरोग्य केंद्र यांच्या समोर 1 मीटर अंतरावर रखाने आखून दिलेल्या जागेत लोकांना रांगेत उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘सोशल डिस्टनसिंग’चे पालन लोकांनी करायला हवे तसेच शक्य तेवढी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.