Coronavirus : एका दिवसात वाढले ‘कोरोना’चे 53 हजार नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 45 हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सोमवारी कोरोना रूग्णांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचली. २४ तासांत कोरोनाचे ५३ हजार ६०१ नवीन रुग्ण आढळले. एका दिवसात ८७१ मृत्यूही झाले. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ४५ हजार ३५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत ४८,८१० नवीन प्रकरणे आणि ५३७ मृत्यू, ब्राझीलमध्ये २१,८८८ प्रकरणे आणि ७२१ मृत्यू आहेत. मात्र चार दिवसानंतर भारतात ६० हजाराहूनही कमी प्रकरणे आढळली आहेत.

जगात २ कोटीहून अधिक रुग्ण आहेत. केवळ मागील २० दिवसात ५० लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यापैकी ९.७२ लाख (१९.४४%) ही भारतातील आहेत. मात्र जगातील एकूण रुग्णांपैकी ११% रुग्ण भारतात आहेत. मागील आठवड्याची सरासरी पाहता जगातील ६३% नवीन रुग्ण फक्त भारत (२४.८२%), अमेरिका (२०.६४%) आणि ब्राझील (१७.६४%) मध्ये आढळले आहेत.

आता किती ऍक्टिव्ह प्रकरणे?
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाची ६ लाख ३९ हजार ९२९ सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत ४५ हजार २५७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५ लाख ८३ हजार ४८९ लोक बरे झाले आहेत.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांची परिस्थिती
सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९१८१ नवीन रुग्ण आढळले. ६७११ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आणि २९३ लोकांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे राज्यात आता १,४७,७३५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा १८ हजारांवर गेला आहे. आतापर्यंत १८०५० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ३,५८,४२१ लोक बरे झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा ३ लाखांवर गेला आहे. आतापर्यंत राज्यातील ३,०२,८१५ लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी ५,९१४ नवीन रुग्ण वाढले. एकूण संसर्ग झालेल्यांपैकी २,४४,६७५ लोक बरे झाले आहेत, तर ५,०४१ लोक मरण पावले आहेत.

दिल्लीत कोरोना रिकव्हरी रेट आता ९०.०९ टक्के झाला आहे. आता राष्ट्रीय राजधानीत केवळ ७.०७ टक्के ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, तर मृत्यूचे प्रमाण -२.८२% आहे. २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे ७०७ नवीन रुग्ण आढळले आणि त्यानंतर संक्रमितांची संख्या १,४६,१३४ वर गेली.

बिहारमध्ये कोरोनाची संक्रमितांची संख्या ८२,७४१ वर गेली आहे. गेल्या २४ तासात ७५,३४६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यातून ३०२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले. सर्वाधिक ४०२ नवीन रुग्ण पाटणामध्ये आढळले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या १ लाख २६ हजार ७२२ वर पोहोचली आहे. सोमवारी २४ तासांत राज्यात ४ हजार १९७ नवीन रुग्ण वाढले, तर ५१ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त ९ मृत्यू कानपूर नगरमध्ये झाले.

मृत्यू दर घसरून १.९९ टक्के झाला
आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे २३ लाख प्रकरणे आढळली आहेत. या प्रकरणांमध्ये सक्रीय रूग्णांची संख्या ६ लाख ४० हजार आहे. आकडेवारीनुसार, मृत्यूचे प्रमाण १.९९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

जगात एक चतुर्थांश रुग्ण आता फक्त भारतात
मागील आठवड्याची सरासरी पाहता जगातील ६३% नवीन रुग्ण फक्त भारत (२४.८२%), अमेरिका (२०.६४%) आणि ब्राझील (१७.६४%) मध्ये आढळले आहेत. म्हणजेच जगातील एक चतुर्थांश रुग्ण आता फक्त भारतात सापडत आहेत. या तीन देशांना वगळता उर्वरित जगात केवळ ३७% रुग्ण आढळले आहेत.

दिलासादायक बाब अशी आहे की, जगात १४ दिवसांपासून नवीन रुग्णांची सरासरी वाढली नाही. डब्ल्यूएचओचा विश्वास आहे की, ब्राझील आणि अमेरिकेत नवीन रूग्णांची संख्या स्थिर झाली आहे, तर भारताची निरंतर वाढत आहे.