Coronavirus : ‘त्या’ टॅक्सीमुळं मुंबईत 5 जणांना ‘कोरोना’ची लागण आणि एकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत मंगळवारी दुहईबहून परतलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधिताने टॅक्सीमधून प्रवास केला होता. त्यानंतर त्याच टॅक्सीतून ये-जा करणाार्‍या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे.

पुण्यात स्थायिक असणारे पती-पत्नी आणि मुलगी दुबईहून मुंबईत परतले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांनी पुण्यासाठी टॅक्सी बूक केली होती. पती-पत्नी आणि मुलगी यांना नंतर कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्याच टॅक्सीत प्रवास करणार्‍या अन्य दोन लोकांनी आणि चालकालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले होते.

अशा पद्धतीने एकाच टॅक्सीतून प्रवास केल्याने पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत राहणारी 64 वर्षीय व्यक्ती त्याच टॅक्सीने प्रवास करत विमातळावरुन घरी पोहोचली होती. मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले.