चिकन अन् अंड्यांमुळं ‘कोरोना’ व्हायरस ‘फोफावत’ असल्याची ‘अफवा’, जागृकतेसाठी मंंत्र्यांनीच खाल्ली ‘कोंबडी’

हैद्राबाद : वृत्त संस्था – चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सर्वत्र पसरल्याने तेलंगानाच्या मंत्र्यांनी सामुहिकरित्या चिकन खाल्ले. तेलंगानाचे मंत्री केटी रामा राव, एटेला राजेंदर, तलसानी श्रीनिवास यादव आणि अन्य मंत्र्यांनी शुक्रवारी हैद्राबादमध्ये व्यासपीठावर चिकन खाल्ले आणि चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, ही अफवा न पसरवण्याचे आवाहन लोकांना केले.

अंडी आणि चिकन खाल्ल्याने कोरोनो व्हायरसची लागण होते, अशी अफवा देशभरात वेगाने पसरत आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर पसरत असलेल्या अशा अफवांमुळे चिकनच्या विक्रीत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मागील एक महिन्यात चिकनचे दर 70 टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 2,867 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये या आजारामुळे मरणार्‍यांची संख्या 2,788 झाली आहे. तर इराणमध्ये 34, इटलीमध्ये 17, दक्षिण कोरियात 13, जपानमध्ये 9, हाँगकाँग आणि फ्रान्समध्ये 2-2 आणि फिलीपिन्स व तैवानमध्ये 1-1 व्यक्तीचा मृत्यू या व्हायरसमुळे झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या भितीमुळे इराणमध्ये विमानसेवा बंद केल्याने तेथे 340 भारतीय मच्छिमार अडकले आहेत. आता गुजरात सरकारने केंद्र सरकारला या मच्छिमारांच्या सुटकेसाठी आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे मंत्री मंत्री रामन पाटकर यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.

पाटकर यांनी म्हटले की, मच्छिमार इराणच्या होर्मुजन प्रांतातील बंदर-ए-चिरू मध्ये अडकले आहेत. ते भारतात परतू शकत नाहीत, कारण इराणी अधिकार्‍यांनी विमानतळ बंद केले आहेत. लोकांना देशाच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही.