‘कोविसेल्फ’नं घरबसल्या करू शकता कोरोना व्हायरसची टेस्ट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने कोविड-19 संसर्गाची माहिती मिळवण्यासाठी एक घरगुती टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. त्याचा उपयोग कसा करायचा याचाही सल्ला दिला आहे. कोविसेल्फच्या माध्यमातून दोन मिनिटांत टेस्ट करता येईल आणि याचे परिणाम 15 मिनिटांत मिळेल तेही घरबसल्या.

आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले, की सरकार घरातच कोरोना टेस्ट करण्याच्या पर्यायाचा विचार करत आहे. ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या देशांत टेस्टिंगची क्षमता वाढू शकते. हे टेस्टिंग किट पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या किट कसे करेल काम…

–  आयसीएमआरने कोविड-19 रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी टेस्टिंग किट कोविसेल्फटीएमला मंजूरी दिली आहे. या किटला पुण्याच्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेडने बनवले आहे.

–  फक्त सिम्प्टोमॅटिक लोक आणि संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनेच याचा वापर करावा.

अशी करा टेस्ट…

–  स्वॅब पॅकेटला खालून फाडा आणि स्वॅब काढा. स्वॅबच्या पुढच्या भागाला स्पर्श करू नये

–  नाकातून नमुने घेतल्यानंतर अगोदरच भरलेल्या एका ट्यूबमध्ये बुडवावे. खालच्या बाजूने ट्यूबला दाबा आणि नाकाच्या स्वॅबला 10 वेळा फिरवा. स्वॅब भरलेल्या ट्यूबच्या बफरमध्ये चांगल्याप्रकारे बुडाल्याचे निश्चित करा.

–  टेस्ट डिव्हाईसला उघडल्यानंतर 5 मिनिटांमध्ये वापर करावा. त्यानंतर ट्यूबमध्ये ठेवलेल्या नुमन्यांच्या मिश्रणाला दाबून टेस्ट डिव्हाईसवर टाका आणि 10-15 मिनिटांपर्यंत परिणाम येण्याची वाट पाहावी. 20 मिनिटांच्या आत परिणाम दिसतील. जास्त संक्रमित परिणाम 10-15 मिनिटांत दिसेल. निगेटिव्ह टेस्ट पाहण्यासाठी 20 मिनिटे प्रतिक्षा करावी. 20 मिनिटानंतर येणारे परिणाम अचूक असण्याची शक्यता कमी असेल,

–  टेस्टच्या परिणामाचे फोटो तुमच्या फोनमध्ये घ्यावे. त्यानंतर मायलॅब कोविसेल्फटीएम मोबाईल ऍपवर परिणामाच्या विश्लेषणची प्रतिक्षा करावी.

असे पाहा परिणाम

जर दोन्ही क्वालिटी कंट्रोल लाईन सी आणि डिटेक्शन लाईन दिसत असेल तर नोवेल कोरोना व्हायरस अँटिजेन दिसेल आणि परिणाम पॉझिटिव्ह दिसेल. जर फक्त क्लालिटी कंट्रोल लाईन सी दिसत असेल आणि टेस्ट लाईन 41 दिसत नसेल तर परिणाम निगेटिव्ह असेल.