Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या ‘उत्पत्ती’चं गुपित नव्या संशोधनात समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचे रहस्य एका नवीन संशोधनात समोर आले आहे. संशोधकांनी वटवाघूळमध्ये आढळलेल्या सार्स-COV-२ जवळच्या प्रजाती शोधल्या आहेत, ज्यावरून हे सिद्ध होते कि कोविड-१९ आजारासाठी जबाबदार असलेला व्हायरस लॅबमध्ये तयार केला नसून नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. चीनमधील शेनडोंगे फर्स्ट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, धोरण तयार करणाऱ्या आणि सामान्य लोकांमध्ये सार्स-सीओव्ही-२ विषाणूच्या उत्पत्तीविषयी चर्चा सुरू आहे.