Coronavirus : थेऊरमध्ये ‘कोरोना’चे 7 नवे पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 120 वर

थेऊर : पूर्व हवेलीतील गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून पुणे सोलापूर महामार्गावरील बहुतेक सर्व गावात नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे यावर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.यामध्ये तिर्थक्षेत्र थेऊरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या 120 वर पोहोचली आहे. यातील सात जण या आजाराने बळी गेले आहेत.

हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील दररोज कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर असतो तर कधी तो दोनशेच्यावर पोहोचतो.यामध्ये लोणी काळभोर कदमवाकवस्ती कुंजीरवाडी उरुळी कांचन वाघोली मांजरी बुद्रुक आव्हाळवाडी या गावात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी खुप खबरदारी घेणे आवश्यक आहे परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

थेऊर येथे सातत्याने रुग्ण संख्या वाढत असून आज हा आकडा 120 वर पोहोचला आहे यातील 37 जण एक्टीव असून उपचार घेत आहेत आजपर्यंत 76 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार नवीन सात रुग्णाची भर पडली आहे.आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपण कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला असल्यास स्वतः विलगीकरण करुन घ्या तसेच कोरोनाची काही लक्षणे आढळली तर प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करुन माहिती द्यावी.