Coronavirus : उस्मानाबादमध्ये ‘कोरोना’चा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण,पूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील सर्व ‘निगेटिव्ह’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात यापूर्वी आढळलेल्या दोघा कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्याचे सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असताना दुसर्‍याच एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण उमरगा शहरातील असून त्याचा प्रवास इतिहास व संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम सुरु झाले आहे.

उमरगा तालुक्यातील बलसुर व लोहारा तालुक्यातील धानुरी येथील दोघांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा हाती आले. त्यानुसार बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

त्यावेळी उमरगा येथील एका संशयितांचा गुरुवारी नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो मात्र, पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागी झाली आहे. त्यांनी ही व्यक्ती रहात असलेला उमरगा शहरातील भाग पूर्णपणे सील करण्यास मध्यरात्रीपासून सुरुवात केली आहे. या व्यक्तीने कोठे कोठे प्रवास केला होता, तो कोणाच्या संपर्कात आला होता, याचा शोध घेतला जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like