कोविड टास्क फोर्सने दिला सावधानतेचा इशारा, म्हणाले – ‘2 ते 4 आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाची (Maharashtra Coronavirus) दुसरी लाट ब-यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जात असतानाचा आता तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी (3rd Covid Wave In Maharashtra) लढायला तयार राहा. 2-4 आठवड्यातच महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट (3rd Covid Wave In Maharashtra) येणार असल्याचा सावधानतेचा इशारा कोविड टास्क फोर्सने दिला आहे.
coronavirus third wave could hit maharashtra in 2 4 weeks said task force of maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील तिसऱ्या लाटेबाबत बैठक झाली. यावेळी बैठकीत राज्यातील कोविड टास्क फोर्सने इशारा दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारने (Maharashtra Government) आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे आदीची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.

तिस-या लाटेत कोरोना प्रकरण, अ‍ॅक्टिव्ह केसेस दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पट होण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्टिव्ह केसेस 8 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. यापैकी 10 टक्के प्रकरण लहान मुलं, तरुण किंवा वृध्द व्यक्ती असण्याची शक्यता आहे. पण लहान मुलांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निम्न मध्यम वर्गाला या लाटेचा जास्त धोका आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करायला हवे. राज्यात ब्रिटनसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जिथ दुसरी लाट कमी व्हायच्या 4 आठवडे आधीच तिसरी लाट येणार आहे. कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टा प्लस (Delta plus) हा राज्यात तिसऱ्या लाटेत शिरकाव होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यातही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या (State Health Department) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.

Wab Title :-coronavirus third wave could hit maharashtra in 2 4 weeks said task force of maharashtra

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज