COVID 3rd wave : मुलांसाठी खरोखर घातक असेल का तिसरी लाट ?, जाणून घ्या AIIMS चे संचालक काय म्हणाले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारत कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहेत. यामध्ये लाखो लोक संक्रमित झाले आणि हजारो लोकांचा  मृत्यू झाला आणि हे सत्र अजूनही सुरूच आहे. या दरम्यान कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची COVID 3rd wave शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. तसेच यामध्ये मुले सर्वात जास्त प्रभावित होतील असे म्हटले जात आहे.

तिसर्‍या लाटेबाबत एम्स काय म्हणाले…
मुलांवर तिसर्‍या लाटेच्या COVID 3rd wave संभाव्य प्रभावाबाबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की,
अजूनपर्यंत असा कोणताही पुरावा नाही की कोविड-19 ची पुढील लाट मुलांना जास्त संक्रमित करू शकते आणि त्यामध्ये जास्त प्रकरणे येतील.

त्यांनी म्हटले, पहिल्या अणि दुसर्‍या टप्प्यातील आकड्यांवरून समजते की मुले सामान्यपणे कोविड-19 पासून सुरक्षित आहेत.
आणि त्यांच्यात संसर्ग जरी होत असला तरी तो किरकोळ आहे.

मुलांमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे
त्यांनी म्हटले की, जर आपण पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील आकडे पाहिले तर ते खुप मिळते-जुळते आहेत आणि हे दिसते की,
मुले सामान्यपणे सुरक्षित आहेत आणि जर त्यांच्यात संसर्ग झाला तरी सुद्धा तो किरकोळ संसर्ग येतो.
आणि व्हायरस बदललेला नाही यासाठी अशाप्रकारचे संकेत मिळालेले नाहीत की, तिसर्‍या लाटेत मुले जास्त प्रभावित होतील.

त्यांनी म्हटले, अशाप्रकारच्या संकल्पना आहेत की, व्हायरस शरीरात एसीई रिसेप्टर (एक प्रकारचे इंजाइम ते आतडी, किडनी, हृदयाच्या पेशींशी संबंधीत असते) च्या माध्यमातून प्रवेश करते आणि प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये हे रिसेप्टर कमी असते.

मुले प्रभावित होण्याचा ठोस पुरावा नाही
गुलेरिया यांनी म्हटले, ज्या लोकांनी हा सिद्धांत प्रसिद्ध केला त्यांचे म्हणणे आहे की,
आतापर्यंत मुले प्रभावित झालेली नाहीत, यासाठी संभाव्य तिसर्‍या लाटेत ती प्रभावित होतील.
परंतु अजूनपर्यंत पुरावा मिळालेला नाही की, पुढील लाटेत मुलांमध्ये याचा गंभीर संसर्ग होईल किंवा त्यांच्यात जास्त प्रकरणे येतील.

इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने अलिकडेच म्हटले होते की, मुलांमध्ये सुद्धा प्रौढांइतकाच धोका दिसून येतो, परंतु तिसर्‍या लाटेत विशेषकरून मुले प्रभावित होण्याची शक्यता नाही.

देशातील प्रमुख बालहक्क संस्था राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) म्हटले आहे की, देशात कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता केंद्र आणि राज्य सरकारांनी मुले आणि नवजातांना वाचवण्यासाठी तयारीचा वेग वाढवला पाहिजे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत